Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ambani security scare : वाझे - हिरेन प्रकरणात 'कल्चर हाऊस' चे काय...

Ambani security scare : वाझे – हिरेन प्रकरणात ‘कल्चर हाऊस’ चे काय आहे नेमकं कनेक्शन ?

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात आता नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) ची टीम आता मुंबईतल्या बाबुलनाथ परिसरात दाखल झाली आहे. याठिकाणी सोनी इमारतीमध्ये असलेल्या कल्चर हाऊस हॉटेलमध्ये सध्या एनआयएच्या टीमकडून तपासणी सुरू आहे. कल्चर हाऊसचे हॉटेलचे या संपुर्ण घटनेशी काय कनेक्शन आहे, याचा तपास एनआयएकडून करण्यात येणार आहे. त्यासाठीच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याठिकाणी सध्या एनआयएच्या टीमकडून चौकशी सुरू आहे. याठिकाणीच काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या टीमकडून रात्रीच्या वेळी सचिन वाझे यांना आणण्यात आले होते. तसेच पीपीई किट घालून त्यांना १५ पावले चालण्यासाठीही सांगण्यात आले होते. आता पुन्हा एकदा एनआयएच्या टीमने या प्रकरणात कल्चर हाऊस हॉटेलमध्ये चौकशीला सुरूवात केली आहे. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणात कल्चर हाऊस तसेच मनसुख हिरेन हत्या आणि स्फोटकांच्या स्कॉर्पिओचे काय कनेक्शन आहे याचा उलगडा होण्याची शक्यता एनआयएमधील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

आठवड्याभरापूर्वीच एनआयएची टीम एपीआय सचिन वाझे यांना घेऊन बाबुलनाथ परिसरात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी पीपीई किट घातलेली व्यक्ती नेमकी कोण आहे ? याचा तपास एनआयएकडून करण्यात आला होता. तसेच सचिन वाझे यांनाही पीपीई किट घालून याठिकाणी पंधरा पावले चालवण्यात आले होते. या सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये दिसणाऱी व्यक्ती सचिन वाझे हीच आहे का ? याचा तपासही एनआयएकडून केला जात आहे. याच प्रकरणाचा भाग म्हणून मुलुंड टोलनाका येथूनही पीपीई किटचे जळालेले तुकडे आणि राख एनआयएच्या टीमने मुलुंडच्या कांदळवनातून हस्तगत केली होती. त्यानंतरच बाबुलनाथ याठिकाणी एनआयएच्या टीमकडून सचिन वाझे यांना आणण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणात लवकरच एका माजी पोलीस अधिकाऱ्यासह गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याला अटक होण्याची दात शक्यता आहे. याआधी गेल्या महिन्यात ३ मार्च रोजी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्या सोबत हे दोन अधिकारी अंधेरी चकाला या ठिकाणी एकत्र आले असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच त्या परिसरातील सीसीटीव्ही मिळवण्याचा एनआयए प्रयत्न करीत आहे.


 

- Advertisement -