घरताज्या घडामोडीambani security scare : NIA पाठोपाठ आता ED ची एंट्री होणार

ambani security scare : NIA पाठोपाठ आता ED ची एंट्री होणार

Subscribe

वाझेंसह आणखी आयपीएस अधिकारी येणार गोत्यात

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे तपास प्रकरण केंद्राची यंत्रणा असलेल्या नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) मार्फत तपास सुरू आहे. आता या संपुर्ण प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय (ED) ची एंट्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. सचिन वाझे यांच्या मर्सिडिज कारमध्ये सापडलेल्या लाखो रूपयांचे धागेदोरे शोधण्यासाठीच ईडीची एंट्री हा तपासाचा पुढचा भाग असणार आहे. सचिन वाझे संचालक पदी असलेल्या कंपन्यांचा खुलासा याआधीच भाजपकडून करण्यात आला होता. त्यातच सचिन वाझे यांचे बेटींग आणि बुकी कनेक्शन, लेडिज बारवरील धाडी तसेच याआधीच्या पोलिस सेवेतल्या ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या आर्थिक उलाढालींचा उलगडाही या ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने उघड होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलिस निरीशक्षक असलेल्या वाझेंचा महिन्याचा पगार सरासरी ६० हजार असताना शेकडो कोटींची प्रॉपर्टी जमा केल्याचा तपासही ईडी करणार आहे. एकुणच केंद्राच्या एनआयए या तपास यंत्रणेनंतर आता आर्थिक एंगल तपासण्यासाठी यापुढच्या काळात या संपुर्ण प्रकरणात ईडीची होणारी एंट्री ही महत्वाची मानली जात आहे.

आयपीएलमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या बुकींसोबत सचिन वाझे यांचे संबंध होते. तसेच सचिन वाझे यांनी बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितल्याचे नितेश राणे यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. सचिन वाझे आणि युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्यात बेटींगसाठीचे कनेक्शन एनआयएने काढावे अशीही मागणी नितेश राणे यांनी केली होती. तसेच भाजपचे आमदार राम कदम यांनीही वाझे आणि मातोश्री कनेक्शन हे ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. मुंबईत रात्रभर बिअर बार सुरू ठेवून वाझे यांनी बार मालकांकडून किती पैसे वसुल केले असाही सवाल राम कदम यांनी केला होता. तसेच वाझे यांच्यावर कृपा असणारा सरकारी अधिकारी कोण ? असाही सवाल त्यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारमधील कोणत्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा यामध्ये हात आहे का ? असेही कदम यांनी विचारले होते.

- Advertisement -

तर मर्सिडिज कारमध्ये नोटा मोजण्याचे मशीन सापडल्यानेच भाजप नेते आशिष शेलार यांनी हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम आहे का ? असा सवाल केला आहे.

शिवसेनेचे अर्धा डझन नेते सचिन वाझेंचे बिझनेस पार्टनर

सचिन वाझे जवळपास तीन कंपन्यांवर संचालक पदी कार्यरत होते अशी माहिती समोर आली आहे. त्याव्यतिरिक्तही सचिन वाझे यांचे अनेक कंपन्यांसोबतचे बिझनेस कनेक्शन समोर आले आहे. बिझनेस कंपन्यांमध्ये कंस्ट्रक्शन कंपन्यांपासून ते मल्टी डिजिटल कंपन्यांमध्ये सचिन वाझे हे बिझनेस पार्टनर होते, अशी माहिती समोर आली आहे. सचिन वाझे आणि शिवसेना नेत्यांचे बिझनेस कनेक्शनचा गौप्यस्फोट भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर असणाऱ्या सचिन वाझे यांनी सेवानिवृत्ती घेतल्यावर त्यांचा किती कंपन्यांमध्ये सहभाग होता, तसेच या कंपन्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा कसा सहभाग होता याचा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेच्या मुलुंड ठाण्यातील नेत्यांचा सहभाग सचिन वाझे यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सरकारी नोकरीत असताना सचिन वाझे यांनी या कंपन्यांबाबतची माहिती पोलिस दलाला दिली होती का ? असाही सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.

- Advertisement -

कोणत्या कंपन्यांमध्ये आहेत सचिन वाझे संचालक ?

१. मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड
२. टेकलिगल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड
३. डिजिनेक्स्ट मल्टी मिडिया लिमिटेड

मल्टीबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स

मल्टीबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स लिमिटेड ही १९ जानेवारी २०१३ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. बिगर सरकारी अशी कंपनी असून मुंबई येथे या कंपनीची नोंदणी आहे. शेअर कॅपिटल म्हणून या कंपनीची ५ लाख रूपयांची गुंतवणुक असून बांधकाम व्यवसायातील ही एक कंपनी आहे. या कंपनीची आतापर्यंत कोणतीही वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नसून कंपनीची बॅलेन्स शीटदेखील फाईल नसल्याचे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा डेटा आहे. या कंपनीच्या संचालक पदावर सचिन वाझे, उदय वागळे, यश वागळे, पंढरी गवई यांची संचालक म्हणून नोंदणी आहे. या कंपनीचे कार्यालय हे ठाण्यातील तीन हात नाका येथे आहे. ही ८ वर्षे ही जुनी कंपनी असून बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -