घरताज्या घडामोडीambani security scare : 'वसुली गॅंग' साठी उद्धवजी, अनिल देशमुखही जबाबदारच !...

ambani security scare : ‘वसुली गॅंग’ साठी उद्धवजी, अनिल देशमुखही जबाबदारच ! – किरीट सोमय्या

Subscribe

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता ठाकरे सरकारमध्ये पळापळ सुरू झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख या संपुर्ण प्रकरणासाठी परमबीर सिंह जबाबदार असल्याचे सांगत आहेत. अनिल देशमुख आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. एपीआय़ सचिन वाझे यांच्या पोलिस दलातील नियुक्तीसाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. त्यामुळेच वसुली गॅंगसाठी उद्धव ठाकरेजी आणि अनिल देशमुखजी दोघेही जबाबदार आहेत असा आरोप भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सचिन वाझे संचालक असलेल्या कंपन्यांमध्ये आणखी मोठा खुलासा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. आणखी १५ जणांची नावे किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहेत. सचिन वाझे यांनी काही कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावे नोंदणी केल्या होत्या असाही दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

डिजिनेक्स्ट मल्टीमिडिया लिमिटेड, मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या दोन कंपन्यांमधील संचालकांची यादी किरीट सोमय्या यांनी जाहीर केली आहे. डिजिनेक्स्ट कंपन्यांमध्ये आठ जणांची नावे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केली आहेत. या संचालकांमध्ये काही मित्रांची तर काही नातलगांची नावेही आढळली आहेत. मल्टीबिल्ड्र इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये सहा संचालकांची नावे आहेत. तर टेकलिगल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चार संचालकांची नावे समोर आली आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -