Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Ambani security scare: एँटीलिया बाहेर स्कॉर्पिओ ठेवली, अन् मुंबई आयुक्तालयात इनोवा कार...

Ambani security scare: एँटीलिया बाहेर स्कॉर्पिओ ठेवली, अन् मुंबई आयुक्तालयात इनोवा कार केली पार्क

एनआयएच्या पथकाने लावला इनोवाचा छडा

Related Story

- Advertisement -

प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह स्कॉर्पिओ गाडी सापडली या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्यांसह स्कॉर्पिओ आढळली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओसह आणखी एख इनोवा गाडी घटनास्थळी आली असल्याचे आढळले होते. याबाबत आधिक तपास केला असता स्फोटक प्रकरणातील इनोवा कार मुंबई कमिश्ननर ऑफिसमध्ये उभी करण्यात आली होती. एनआयएच्या पथकाने १००पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केल्यानंतर इनोवा गाडी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमध्ये उभी असल्याचे आढळले आहे. रविवारी एनआयएच्या पथकाने कुर्ला येथील मीठी नदीच्या पात्रातून नंबर प्लेट आणि डीव्हीआर शोधून काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांना इनोवा गाडी मुंबई कमिश्ननर ऑफिसच्या पार्किंगमध्ये इनोवा गाडी पार्क असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एका अधिकाऱ्याला पार्किंमध्ये असलेल्या सर्व इनोवा गाडींचे व्हिडिओ काढण्यास सांगितले. अधिकाऱ्याने छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने पार्किंगमध्ये असलेल्या गाडीचे व्हिडिओ काढले. नंतर या गाडीचा आणि घटनास्थळी गेलेल्या इनोवा गाडीचा तपास केला. या तपासात एनआयएची टीम या निष्कर्शावर पोहोचली की कमिश्नन ऑफिसच्या पार्किंगमधील इनोवा स्फोटक प्रकरणात वापरण्यात आली होती.

कशी पटली गाडीची ओळख

- Advertisement -

इनोवा गाडीचा शोध घेणे एनआयएच्या पथकासाठी सोपे नव्हते. परंतु घटनास्थळावरील आणि मुंबईतील असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर इनोवा गाडी जेव्हा मुंबईत दाखल झाली तेव्हा या गाडीच्या नंबर प्लेट खाली एक स्टिकर लावण्यात आला होता. गाडीवर असलेला डेंट लपवण्यासाठी हा स्टिकर लावण्यात आला होता.

यानंतर पुन्हा इनोवा गाडी मुंबईत दाखल झाली तेव्हा या गाडीची नंबर प्लेट वेगळी होती. परंतु या नंबर प्लेटच्या खाली सारखाच स्टिकर लावण्यात आला होता. त्यामुळे ही गाडी ओळखण्यात एनआयएच्या पथकाला यश आले आहे. स्फोटक प्रकरणात एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केले आहे. सचिन वाझे यांनी वापरलेल्या गाड्या एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपासात एनआयएच्या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -