घरताज्या घडामोडीambani security scare : PPE kit मुलुंड कांदळवनात जाळल्याचा NIA चा मोठा...

ambani security scare : PPE kit मुलुंड कांदळवनात जाळल्याचा NIA चा मोठा खुलासा

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणातले सीसीटीव्ही फुटेज तपासा दरम्यान सध्या चर्चेत आहे. पीपीई किट घातलेली व्यक्ती कोण याचा तपास या सगळ्या प्रकरणात नॅशनल इनवेस्टीगेशन एनज्सी (NIA) ने कडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सीएसटी येथील पार्किंग लॉटमध्ये सापडलेल्या मर्सिडिज गाडीमध्ये पार्किंग सापडलेल्या गाडीत लाखो रूपये, पैसे मोजणारे मशीन, कपडे , केरोसिन यासारख्या गोष्टी सापडल्या होत्या. त्यानंतर एनआयएकडून ती पीपीई किट घालणारी व्यक्ती ही सचिन वाझे असल्याचा खुलासा करण्यात आला होता. पण आता एनआयने या पीपीई किटचा मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी हे पीपीई किट कशा पद्धतीने नष्ट केले याचा खुलासा एनआयएमार्फत करण्यात आला आहे. (ambani security scare : NIA team confirms that PPE kit was burned at mulund mangroves)

पीपीई किटच नेमक काय झालं ?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेली व्यक्ती ही सचिन वाझे हीच पीपीई किट परिधान करून होती, असा खुलासा एनआयएकडून नुकताच करण्यात आला. पण हे पीपीई किट नष्ट केल्याचा संशय एनआएला होता. म्हणूनच एनआयएने या पीपीई किटचा शोध सुरू ठेवला होता. अखेर या पीपीई किटचा छडा लागला आहे. सचिन वाझे यांनी मुलुंड चेक नाक्यापासून काही अंतरावर हे पीपीई किट कांदळवनाच्या झाडीत जाळल्याचा खुलासा आता एनआयएने केला आहे. पीपीई किटमधील कुर्ता आणि पायजमा जाळल्याचे तपासात उघड झाले आहे. स्वतः एनआयएच्या टीमने त्याठिकाणी पोहचत एफएसएल या टीमने घटनास्थळावरून माती आणि पीपीई किटचे तुकडे, राख अशा गोष्टी घेऊन एनआयएची टीम त्या ठिकाणाहून नेले असल्याचे कळते.

- Advertisement -

आणखी दोन गाड्या जप्त

अंबानी स्फोटक प्रकरणात आणखी गाड्या एनआयएच्या टीमने हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक मर्सिडिज कार तर दुसरी प्रॅडो गाडी जप्त केल्याचे समोर आले आहे. प्रॅडो ही गाडी एका शिवसैनिकाची असून त्या शिवसैनिकाने आमदारकीची निवडणुक लढवल्याचेही समोर आले आहे.

वाझेंच्या ताब्यासाठी एटीएसचा प्रयत्न सुरू

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएसकडून प्रयत्न सुरू झाला आहे. आज शुक्रवारी सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जवर सुनावणी होणार आहे. त्यावर एटीएस आपले म्हणणे कोर्टात मांडणार आहे. वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी एटीएस न्यायलायकडून आरोपीचे प्रॉडक्शन वॉरंट घेणार आहे असे कळते.

- Advertisement -

एनआयएनेकडून पोलिस निरीक्षक चौकशीसाठी ताब्यात

एटीएस ने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या एका प्रभारी पोलीस निरीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एटीएसच्या काळाचौकी युनिट मध्ये या अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. हा अधिकारी पश्चिम उपनगरातील युनिट मधील असल्याची माहिती समोर येत आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -