Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ambani security scare : सचिन वाझेंचे काय आहे मिठी नदीचे कनेक्शन? NIA...

Ambani security scare : सचिन वाझेंचे काय आहे मिठी नदीचे कनेक्शन? NIA टीम दाखल

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांनी कशा पद्धतीने पुरावे नष्ट केले यामधील आणखी एक मोठा खुलासा आज रविवारी दिवसभरात झाला. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझे यांनी मिठी नदीच्या पाण्याचाही वापर केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणीच आज रविवारी नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) चे पथक कुर्ला मिठी नदी परिसरात पोहचले होते. याठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच याठिकाणी तपास मोहीम सुरू होती.

एनआयएच्या टीमने सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत एका गाडीची नंबरप्लेट, एक सीपीयू आणि डीव्हीआर या तीन गोष्टी जप्त केल्या आहेत. या गोष्टींच्या शोधातच एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन कुर्ला मिठी नदी परिसरात आली होती. याठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणखी काही गोष्टींचा शोध सुरू आहे. या दोन्ही प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझे यांनी मिठी नदीच्या पाण्याचाही वापर केला असल्याचे आजच्या एनआए पथकाच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. या संपुर्ण प्रकरणात याआधीच एनआयएच्या टीमने सचिन वाझे यांना अनेक ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी नेले आहे. काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या टीमने गुन्ह्याचे नाट्य रूपांतरही काही ठिकाणी केले होते. त्याअंतर्गतच सचिन वाझे यांना पीपीई किट घालून चालायलाही सांगितले होते.

- Advertisement -

सचिन वाझे यांनी वापरलेले पीपीई किट हे मुलुंड टोलनाक्या पुढे कांदळवनात जाळून टाकले होते असाही दावा एनआयएने केला आहे. त्यावेळीही पुरावा नष्ट केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला होता. त्याठिकाणी असलेले जळालेले पीपीई किटचे तुकडे आणि राख तपासादरम्यान घेण्यात आले होते. सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडिज कारमधूनही केरोसिनची बॉटल, पाच लाख रूपये आणि पैसे मोजण्याची मशीन सापडली होती.


 

- Advertisement -