Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ambani security scare : प्रदीप शर्मानेच जिलेटीन आणले होते, वाझेने NIA पुढे...

Ambani security scare : प्रदीप शर्मानेच जिलेटीन आणले होते, वाझेने NIA पुढे तोंड उघडलं

Related Story

- Advertisement -

सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब पाठोपाठच आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटकांचा मोठा खुलासा आज गुरूवारी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) समोर झाला आहे. खुद्द सचिन वाझे यांनीची जिलेटीनबद्दलची माहिती दिली आहे. स्कॉर्पिओत सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या या माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनीच आणल्याला जबाब सचिन वाझे यांनी एनआयएकडे नोंदवला आहे. प्रदीप शर्मा यांनी ही जिलेटीनच्या कांड्या कुठून कधी आणल्या याचाही खुलासा त्यांनी आपल्या जबाबात केला आहे. तसेच मनसुख हिरेन यांचे जिलेटीनच्या कांड्याशी असलेले कनेक्शनही सचिन वाझे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सीमकार्डच्या वापराबाबतची मोठा खुलासा एपीआय सचिन वाझे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच एनआयएपुढे येत्या दिवसांमध्ये सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची एकमेकांसमोर चौकशी होईल अशी माहिती एनआयएमधील सूत्रांनी दिली आहे.

जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ एंटेलियासमोर ठेवतानाही प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता, असा खुलासा सचिन वाझे यांनी केला आहे. जिलेटीनच्या कांड्या आणण्यासाठी प्रदीप शर्मा गुजरातला गेले होता. ३ मार्च ते ४ मार्च दरम्यान त्यांनी गुजरातहून सीमकार्डही आणले. अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ पार्क करताना मनसुख हिरेन आणि प्रदीप शर्मा हे दोघेही सोबत असल्याचा दावा सचिन वाझे यांनी केला आहे.

- Advertisement -

आता या संपुर्ण प्रकरणात प्रदीप शर्मा यांना एनआयएमार्फत पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळेच सलग दुसऱ्या दिवशी प्रदीप शर्मा चौकशीसाठी पोहचले आहेत. या संपुर्ण कटामध्ये प्रदीप शर्मा हे माझ्यासोबत होते, असा खुलासा सचिन वाझे यांनी केला आहे. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणात चौकशीसाठी सचिन वाझे यांच्या समोरच बसवून प्रदीप शर्मा यांचीही चौकशी एनआयए करणार असल्याचे बोलले जात आहे.

 

- Advertisement -