Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईAmbarnath : अंबरनाथमध्ये मृत नवजात अर्भक आढळले

Ambarnath : अंबरनाथमध्ये मृत नवजात अर्भक आढळले

Subscribe

दोन महिला ताब्यात

अंबरनाथ । अंबरनाथ पश्चिममधील शंकर हाईट्स या इमारतीच्या परिसरात एका नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. इमारतीवरून अर्भकाला फेकल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. यातील एक या अर्भकाची आई असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणी संबंधितांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेस २ मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती इमारतीत राहणार्‍या नागरिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अर्भकाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. पुढील पोलीस अधिक तपास करीत आहेच. या घटनेनंतर शंकर हाईट्स फेस २ मध्ये शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -