घरCORONA UPDATEकुलाब्यातील आंबेडकर नगर, गणेशमूर्ती नगरला कोरोनाचा विळखा

कुलाब्यातील आंबेडकर नगर, गणेशमूर्ती नगरला कोरोनाचा विळखा

Subscribe

आंबेडकर नगर, गणेशमूर्ती नगर, गीता नगर हेच प्रमुख कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.

कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉईंट या  महापालिकेच्या ‘ए’ विभागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या २००च्या वर गेली आहे. या संपूर्ण विभागात केवळ पाच ते सहा झोपडपट्टीवस्ती असून त्यातील आंबेडकर नगर, गणेशमूर्ती नगर, गीता नगर हेच प्रमुख कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. परंतु यातील गीता नगरला पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात यश आले असून या झोपडपट्टी वस्तीतच महापालिकेने आपले विशेष लक्ष केंद्रीत केले आहे

महापालिकेच्या ‘ए’ विभागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २००च्या लगबग पोहोचला आहे. या विभागात बहुतांशी सरकारी कार्यालय, खासगी कार्यालये अधिक असून त्यातुलनेत निवासी वापराच्या इमारतीच अधिक आहेत. या विभागात कुल्याब्यातील पाच ते सहा झोपडपट्टी वस्ती वगळता या विभागात इमारतीच अधिक आहेत. मात्र, तरीही येथील झोपडपट्टीच आता महापालिकेची मोठी डोकेदुखी ठरली आहे. येथील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या आंबेडकर नगर येथे ४९ तर गणेशमूर्ती नगरमध्ये २७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर गीता नगर येथे ३ रुग्ण आढळून आले होते. परंतु पोलिसांच्या मदतीने येथील परिसर कोरोनामुक्त करण्यात आला आहे. मात्र, आझाद नगर व सुंदर नगर येथेही कोरोनाचा संसर्ग होवू नये याची काळजी पोलिसांच्या सहकार्याने घेतली जात आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर कुलाबा मार्केट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्केटमधील भाजी विक्रेत्याला वाहनातून भाजी विक्री करण्याची सवलत देण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या ‘ए’ विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गीता नगरमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर अन्य वस्तीत विशेष मोहिम राबवली जात असल्याचे सांगितले. झोपडपट्टी वस्तीतील लोक रेशनसाठी रस्त्यांवर येत असल्याने येथील रेशन दुकानदाराला विश्वासात घेत प्रत्येक नागरिकांना कुपन्स वाटून त्याप्रमाणेच सामान घेण्यासाठी बोलवावे,अशी सूचना केली आहे. आता दिवसाला दुकानदार किती लोकांना सामान देवू शकतो, त्याप्रमाणे त्याने कुपन्सचे वाटप करायचे आहे. ज्यामुळे रस्त्यांवर येणाऱ्या रहिवाशांची संख्या कमी करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -