घरताज्या घडामोडीअमित ठाकरेंकडे कोणकोणती खाती? मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर

अमित ठाकरेंकडे कोणकोणती खाती? मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर

Subscribe

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागावर 'राज' पुत्र अमित ठाकरे ठेवणार करडी नजर.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४ वा वर्धापनदिन नवी मुंबई येथे साजरा होत असताना आज शॅडो कॅबिनेट मंत्र्यांची वर्धापनदिनी घोषणा करण्यात आली. यावेळी ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांना कोणती खाती देण्यात येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, अमित ठाकरे यांना माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यासोबतच वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन आणि ग्रामविकासाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच मराठी भाषा आणि नगरविकास खात्याची देखील ते धुरा सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे अमित ठाकरे आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागावर देखील करडी नजर ठेवणार आहेत.

भाऊ ठेवणार भावाच्या खात्यावर नजर

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेल्या पर्यटन खात्यावर आता अमित ठाकरे यांची करडी नजर असणार आहे. प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष असणार आहे. अमित ठाकरे यांच्याकडे इतर खाती देखील देण्यात आली आहेत. मात्र, पर्यटन मंत्री खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिल्यामुळे पुन्हा एकदा तू तू मै मै होणार का हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

मनसेची शॅडो कॅबिनेट

  • गृह विधी, न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम
  • मराठी भाषा,  माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
  • वित्त आणि गृहनिर्माण : नितिन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
  • महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
  • ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
  • ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे,
  • मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
  • शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
  • कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
  • नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
  • सहकार पणन : दिलिप धोत्रे, कौस्तुभ लिमये
  • अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव
  • मत्स्यविकास : परशुराम उपरकर
  • महिला व बालविकास : शालिनी ठाकरे
  • सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे
  • सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर
  • सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता
  • सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर
  • कौशल्य विकास : स्नेहल जाधव

    हेही वाचा – ‘अरुणोदय झाला’ राज ठाकरेंनी गाणं केले ट्विट

    - Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -