घरमनोरंजनबीग बींच्या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ!

बीग बींच्या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ!

Subscribe

एबी आणि सीडी या सिनेमातून अमिताभजींसोबत विक्रम गोखले देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातून अमिताभ बच्चन, विक्रम गोखलेंसह अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

बॉलिवुडचे शहेनशाह म्हणून ओळख असलेले अमिताभ बच्चन यांचा उत्साह आजही पाहायला मिळतो. अनेक वर्षांचा अनुभव असताना ते वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच अमिताभ बच्चन हे ‘एबी आणि सीडी’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एबी आणि सीडी या सिनेमातून अमिताभजींसोबत विक्रम गोखले देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातून अमिताभ बच्चन, विक्रम गोखलेंसह अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

काय आहे सिनेमात?

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फार निराळ असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती या अडचण वाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखले, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी ‘एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘एबी आणि सीडी’च्या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आणि ‘आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रं, तसेच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकार, पण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: ‘आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य. आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार असल्याचे दिसते आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

अमिताभजींनी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या आणि सिनेरसिकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यामुळेच ‘अमिताभ बच्चन’ म्हटलं की सर्वप्रथम कुतुहल वाटतं आणि जर अमिताभजी तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर’ अशीच काही निराळी गोष्ट प्रेक्षकांना या सिमनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच ‘एबी आणि सीडी’ हा सिनेमा मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात अमिताभजी बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

निर्मात्यांनी शेअर केला किस्सा

‘एबी आणि सीडी’ या चित्रपटाचे निर्माते अक्षय बारदापुरकर यांनी या सिनेमाशी निघडीत एक किस्सा शेअर केला आहे.  ‘सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांनी निर्मात्यांकडे कपडे मागितले नाहीत, त्यांनी स्वत:च्या कपड्यांची सोय स्वत:च केली. आम्ही त्यांना सांगितले की तुमच्या कपड्यांचे माप द्या त्यावर ते म्हणाले, याची तुम्ही चिंता करू नका मी स्वत: कपडे घेऊन येतो. यानंतर चित्रीकरणाच्या दिवशी ते पूर्ण वॅनिटी वॅन घेऊन आले. आणि या कपड्यातून तुम्हाला कोणते कपडे हवे ते आम्हाला निवडायला सांगितले. ‘मराठी सिनेमाच बजेट कमी असत त्यामुळे अमिताभजींनी त्यांच्या कपड्यांची सोय त्यांनी स्वत:च केली असे त्यांनी सांगितले, तसेच यामुळे सिनेमाच्या बजेटला फार मदत झाल्याचे’ त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -