Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Amitabh Video : अमिताभ बच्चन यांचा रुग्णालयातला जुना व्हिडिओ संदेश व्हायरल!

Amitabh Video : अमिताभ बच्चन यांचा रुग्णालयातला जुना व्हिडिओ संदेश व्हायरल!

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त शनिवारी रात्री समोर आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. अमिताभ बच्चन (amitabh bachchan corona positive) यांचे देशभराल कोट्यवधी चाहते आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच लाखो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, आज सकाळपासून अमिताभ बच्चन यांचा नानावटी रुग्णालयातूनच आपल्या या चाहत्यांसाठी, देशवासीयांसाठी आणि देशात कोरोनाशी लढा देण्यात सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल महिन्यात तयार केलेला एक व्हिडिओ संदेश व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विशेषत: नानावटी रुग्णालायत मिळत असलेल्या ट्रीटमेंटचं, तिथल्या डॉक्टर-नर्सेसचं कोतुक केलं आहे.

काय म्हणाले अमिताभ बच्चन व्हिडिओमध्ये?

‘नानावटी हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि नर्स या काळात अतिशय उत्तम काम करत आहेत. सगळ्या रुग्णालयांमध्ये जितके डॉक्टर आणि नर्स काम करत आहेत, ते सर्व इश्वराचे रुप आहेत. तुम्ही मानवतेसाठी काम करत आहात. जीवदानाचं काम करत आहात. मी तुम्हा सगळ्यांसमोर नतमस्तक आहे’, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

- Advertisement -

‘हे दिवस फार कठीण आहेत. सगळ्यांच्या सहनशीलतेच्या कसोटीचा हा काळ आहे. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीही घाबरून जाऊ नका. गोंधळून जाऊ नका. आपण या सगळ्या युद्धात सोबत आहोत. आपण आशा करूयात की लवकर आपण या परिस्थितीतून बाहेर पडू. मला मिळत असलेल्या उपचारांसाठी मी नानावटी हॉस्पिटलच्या (Nanavati Hospital) सर्व कर्मचारी, डॉक्टर आणि नर्सचे मी आभार मानतो’, असं देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांचा थेट रुग्णालयातून संदेश!

कोरोनावर नानावटी रुग्णालयात उपचार घेत असलेले महानायक अमिताभ बच्चन यांचा थेट रुग्णालयातून संदेश..डॉक्टरांचे मानले आभार!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, July 11, 2020

- Advertisement -

दरम्यान, अमिताभ बच्चन शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत. ते या आजाराशी लढा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून काळजी नसावी अशी माहिती अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार करणारे नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर अन्सारी यांनी दिली आहे.

अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला आता सील करण्यात आला असून बंगल्याचं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सकाळीच सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे. तसेच, गेल्या १० दिवसांत बच्चन यांच्या संपर्कात कोण कोण आले होते, त्यांचा शोध सुरू झाला असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -