घरताज्या घडामोडीबिग बींनी 'या' रुग्णालयाला केली तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची मदत

बिग बींनी ‘या’ रुग्णालयाला केली तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची मदत

Subscribe

क्लास-१ प्रकारातील या व्हेंटिलेटमध्ये गरजू रुग्णांना शंभर टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा

बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) नेहमीच सर्वांची मदत करत असतात. आजवर त्यांनी आपल्या लाखोंच्या संपत्तीमधून अनेक गरजूंना मदत केलीय. अशीच मदत यावेळी बिग बींनी मुंबईच्या सायन रुग्णालयाला केली आहे. क्लास -१ प्रकारातील दोन अत्याधुनिक ICU व्हेंटिलेटर्स दिले आहेत. त्याचप्रमाणे तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे मॉनिटर्स,सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर,इन्फ्युजन पंप यासारख्या यंत्रसामग्री देऊन सायन रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. बिग बींनी दिलेले दोन्ही व्हेंटिलेटर्स ICU मध्ये वापरण्यास सुरुवात केली आहेत. या व्हेंटिलेटच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरात जवळपास ३० हून अधिक गरजू रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. ( amitabh bachchan donates ventilators and medical equipments to sion Hospital)

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयात देण्यात आलेल्या क्लास-१ प्रकारातील या व्हेंटिलेटमध्ये गरजू रुग्णांना शंभर टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा आहे. या व्हेंटिलेटरमधील ऑक्सिजनचा दाब कमी जास्त करण्यासाची सुविधा देण्यात आली आहे. एका नळीद्वारे फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

बिग बींनी दिलेल्या व्हेंटिलेटर्स आणि इतर वैद्यकिय यंत्रसामग्रीमुळे रुग्णालयावरील भार कमी होण्यास मदत झाली आहे. रुग्णालयात या व्हेंटिलेटर्स आणि इतर यंत्रसाम्रगीचा शक्य तितक्या गरजूंसाठी उपयोगात आणू, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -