घरमनोरंजन'गरिबांचा अमिताभ' हे माझ्यासाठी सर्वात कौतुकाचे शब्द आहेत - मिथून चक्रवर्ती

‘गरिबांचा अमिताभ’ हे माझ्यासाठी सर्वात कौतुकाचे शब्द आहेत – मिथून चक्रवर्ती

Subscribe

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या अचानक आजारी पडण्यामुळे ते सध्या जास्त चर्चेत आले आहेत. मिथुन यांनी ८०-९० च्या दशकातील काळ रुपेरी पडदा गाजवला होता. सत्तरच्या दशकात त्यांचं अभिनयक्षेत्रात पदार्पण झालं होतं. १९७६ साली त्यांनी मृगया या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्या काळातील लो-बजेट चित्रपटातील डिटेक्टिव्हच्या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. सुरक्षा, वारदात, हम पांच अशा चित्रपटांतील भूमिकांनंतर ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. डान्सिंग स्टार हे बिरुद मिथूनदांना नेहमीसाठी चिकटलं आणि त्यांनरचा त्यांचा प्रवास हा एका लोकप्रिय यशस्वी अभिनेत्याचा प्रवास होता.

एका बाजूला मिथुनदांचा यशस्वी प्रवास चालू असतानाच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचेही सुगीचे दिवस चालू होते. त्याच दिवसांत दो अनजाने (1976), ‘गंगा, जमुना, सरस्वती’ (1988), अग्निपथ (1990) अशा चित्रपटांतून दोघांनीही एकत्र भूमिका साकारल्या होत्या. अग्निपथमध्ये मिथुनदांनी साकारलेला दाक्षिणात्य नारळपाणीवाला आणि अमिताभ बच्चन यांनी साकारलेला विजय दीनानाथ चौहान या दोन्ही भूमिका प्रचंड गाजल्या. पण असं असलं तरी अमिताभ बच्चन इंडस्ट्रीवर अधिराज्य करत होते. त्यांच्या तुलनेत अनेक स्टार्स फिके वाटायचे.

- Advertisement -

याच दरम्यान मिथुनदांना एक उपाधी मिळाली, ती म्हणजे ‘गरिबांचा अमिताभ’. त्या मागे कारणही तसच होतं. बच्चन साहेबांकडे मोठ्या बॅनरचे चित्रपट होते. आणि मिथुन यांच्याकडे बच्चन साहेबांच्या तुलनेत तेवढे मोठे बॅनर नव्हते. पण त्यांच्या चित्रपटांचा व्यवसाय खूप चांगला चालायचा. त्या काळात बजेटनुसार दोन्ही प्रकारच्या चित्रपटांची कमाई त्यांच्या बजेटनुसार होती. दोघेही आपापल्या ठिकाणी सुपरस्टारच होते. म्हणजे मिथुनदांना पाहून चाहते , तो सुद्धा अमिताभ आहे असं म्हणू लागले होते. त्यालाच अनुसरून मिथुन चक्रवर्तींना ‘गरिबांचा अमिताभ’ ही उपाधी मिळाली. मिथुनदांनी स्वतःबद्दलचा हा किस्सा स्वतःच माध्यमांना  सांगितला होता. त्यावर त्यांनीच असही म्हटलं होतं की,  त्यांच्यासाठी हे आतापर्यंतचे सर्वाधिक कौतुकाचे  शब्द आहेत.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -