मंगळसूत्र घातलं तर पतीने गळा पकडलाय असं वाटतं, अमृत फडणवीसांचं वक्तव्य

एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या होत्या. त्यात त्यांनी सामान्य स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर अगदी दिलखुलास उत्तरे दिली. 

आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून त्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. नियमित त्यांची विविध गाणीही प्रदर्शित होत असतात. अशाच एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या होत्या. त्यात त्यांनी सामान्य स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर अगदी दिलखुलास उत्तरे दिली.

झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला असतं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असे मला वाटते.

तसेच, प्रश्न विचारणाऱ्या बाईलाही त्यांनी प्रश्न केला की ‘तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असं तुम्हाला वाटत असेल.’

याच कार्यक्रमात त्यांना चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरीबाबतही विचारण्यात आलं होतं. तुम्ही चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केलीय का ओ मॅडम? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, चांगलं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मला यावरुन अनेक लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात. प्लeस्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोका असतो. काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


तसंच, त्या पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाहीत, तर तिचं मन पाहतात. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.