घरमनोरंजनकोरिओग्राफर सरोज खान यांना 'अमूल'ने वाहिली अनोखी श्रद्धांजली

कोरिओग्राफर सरोज खान यांना ‘अमूल’ने वाहिली अनोखी श्रद्धांजली

Subscribe

हा फोटो शेअर करताना अमूलने लिहिले की - ‘Mother of Dance/Choreography in India’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी शुक्रवारी जगाला निरोप दिला. सरोज खान यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. डान्स कोरिओग्राफर सरोज खान यांना खास शैलीत अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये कॅरीकेचरच्या माध्यमातून सरोज खान सलवार सूट परिधान करुन डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तेजाब चित्रपटातील एक दो तीन या गाण्याचा संदर्भ घेत ही श्रद्धांजली अमूलने वाहिली आहे. हे गाणे सरोज खान यांनी माधुरी दीक्षितसाठी कोरिओग्राफ केले होते.

- Advertisement -

हा फोटो शेअर करताना अमूलने लिहिले की – ‘Mother of Dance/Choreography in India’ ला श्रद्धांजली.

सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती. गेल्या १० दिवसांपासून त्यांना गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर सरोज खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सरोज खान हे बॉलीवूड विश्वातील लाडके कोरिओग्राफर होते.

- Advertisement -

दरम्यान, माधुरीच्या एक दोन तीन या नृत्यामुळे सरोज खान अधिक लोकप्रिय झाल्यात. अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांची आवडती शिष्या होती. बॉलिवूडमधील स्पर्धाबद्दल बोलताना त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं देखील केली होती. तसेच ‘कास्टिंग काऊच’ आणि ‘मी टू’ सारख्या विषयावर देखील त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते.

सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी १९८३ मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी चित्रपटांमधील हिट गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठीही ते खास ओळखले जातात.चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे २ हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे.


प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -