घरCORONA UPDATEकुपर आणि सेव्हनहिल्समध्ये अतिरिक्त ४०० खाटांमध्ये वाढ

कुपर आणि सेव्हनहिल्समध्ये अतिरिक्त ४०० खाटांमध्ये वाढ

Subscribe

शिवसेना विभागप्रमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासमवेत या रुग्णालयांची पाहणी करून अतिरिक्त खाटा वाढवण्याची सूचना केली

मुंबईतील रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना जागा कमी पडत असून वेळीच उपचार होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने आता सेव्हनहिल्स आणि कुपर रुग्णालयांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे खाटा वाढवण्याचा विचार होत आहे. शिवसेना विभागप्रमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासमवेत या रुग्णालयांची पाहणी करून अतिरिक्त खाटा वाढवण्याची सूचना केली असून त्यानुसार प्रशासन आता याठिकाणी अतिरिक्त खाटा वाढवण्यात येणार आहे.

शिवसेना विभागप्रमुख अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी विभागातील महिला विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला संघटक आदींची व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर महिला विभाग संघटक राजुल पटेल तसेच सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांच्यासमवेत कुपर,सेव्हनहिल्स आणि जोगेश्वरी ट्रामा केअर सेंटरची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कुठल्या रुग्णालयात किती खाटा वाढवता येतील याचाही विचार करण्यात आला.

- Advertisement -

सध्या सेव्हनहिल्स १ हजार खाटा कोविड रुग्णांसाठी आहे. त्याठिकाणी सुमारे २०० ते ३०० खाटा वाढल्या जावू शकतात. तर कुपर रुग्णालयात सध्या १८० खाटा कोविड रुग्णांसाठी आहे. त्याठिकाणीही सुमारे २०० ते २२० खाटा वाढल्या जावू शकता. मात्र, जोगेश्वरीतील ट्रामा केअर सेंटर हे पूर्णपणे कोविडसाठीच आहे. त्यामुळे कुपर आणि सेव्हन हिल्समध्ये प्रत्येकी २०० खाटा त्वरीत वाढवण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना दिले असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुमारे ४०० खाटा दोन रुग्णालयांमध्ये वाढल्या जावू शकतात, असे त्यांनी सांगितले.

कोविड रुग्णालयात ओपीडीही सुरु करण्याचे निर्देश

- Advertisement -

महापालिकेच्यावतीने कोरोना कोविड -१९चे बाधित तसेच संशयित व्यक्ती रुग्णालयात आल्यानंतर, खाटांअभावी त्यांच्यावर उपचार केला जात नाही. त्यामुळे योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे कोरोना कोविडच्या उपचारासाठी राखीव असलेल्या रुग्णालयांमध्ये ओपीडी सुरु करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही निर्देश अनिल परब यांनी प्रशासनाला दिले. किमान ओपीडीमध्ये प्राथमिक उपचार केल्यास त्यांची प्रकृती अधिक खालावणार नाही, असेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून  दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -