घरठाणेदीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या संख्येत 6,295 ने वाढ

दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या संख्येत 6,295 ने वाढ

Subscribe

मुंबई : मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनही मोठ्या जल्लोषात झाले. अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (21 सप्टेंबर) सकाळी 6 वाजेपर्यंत श्री गणरायाचे विसर्जन झाले. गतवर्षीपेक्षाही यंदा गणेश मूर्तींच्या संख्येत तब्बल 6,295 ने वाढ झाली आहे. (Increase of 6,295 in the number of Ganesha idols for one and a half days)

यंदा दीड दिवसांच्या विसर्जित मूर्तींची संख्या 66,785 एवढी होती. त्यामध्ये, सार्वजनिक गणेश मूर्तींची संख्या 350 तर, घरगुती मूर्तींची संख्या 66,435 एवढी होती. तसेच, या एकूण 66,785 मूर्तीमध्ये कृत्रिम तलावातील 172 सार्वजनिक तर, 27,564 घरगुती गणेश मूर्तींचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून पुढाकार; घरच्या गणपती बाप्पाचे कृत्रिम तलावात केले विसर्जन

गतवर्षी दीड दिवसांच्या विसर्जित मूर्तींची एकूण संख्या 60,490 एवढी होती. यामध्ये, सार्वजनिक मूर्तींची संख्या 284 तर, घरगुती मूर्तीची संख्या 60,206 एवढी होती. त्यातही, कृत्रिम तलावात विसर्जित सार्वजनिक मूर्तींची संख्या 172 एवढी तर, घरगुती मूर्तींची संख्या 22,410 एवढी होती. यंदा विसर्जित दीड दिवसांच्या गणेशमूर्तींची संख्या व गतवर्षी विसर्जित गणेशमूर्तींची संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या संख्येत एकूण 6,295 ने वाढ झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इतर राज्यांतील आरक्षणाच्या निर्णयाची कार्यपद्धती तपासली जाणार- मुख्यमंत्री शिंदे

ठाणे महानगरपालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चोख बंदोबस्त

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण 15 कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख आदी सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात एकूण 42 ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -