घरमुंबईआसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकलच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकलच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

Subscribe

मुंबई : मुंबईच्या जवळ असलेल्या आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेनच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना कसारावरून आलेल्या लोकल ट्रेनची धडक या महिलेला बसली. त्यात तिचा मृत्यू झाला आहे.

सीताबाई पांढरे असे या महिलेचे नाव आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या 10:55 च्या N 14 नंबरच्या लोकल ट्रेनने या महिलेला धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल वाहतूक काही वेळासाठी खोळंबली आहे.

- Advertisement -

या मार्गावरील लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. आसनगाव रेल्वे स्थानकातील रेल्वे ब्रीज २०१८ साली तोडण्यात आला होता. हा रेल्वे ब्रीज अजूनही बांधलेला नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन वर्षात 100 च्या वर रेल्वे अपघात मृत्यू
नवी मुंबईतील ट्रान्स-हार्बरमार्गावर 2021 मध्ये १२४, तर 2022 मध्ये १२३ जणांनी रेल्वे अपघातात आपला जीव गमवला असून यात रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झालेल्यांची संख्या जास्त आहे. 2021 मध्ये ९०, तर 2022 मध्ये ७२ जणांनी रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमावला आहे. रेल्वेकडून विविध उपाययोजना करून देखील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे.

- Advertisement -

शॉर्टकटमुळे प्रवाशांच्या मृत्यूत वाढ
रेल्वे रुळ ओलांडताना होणार अपघात कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वच रेल्वे स्थानकालगत संरक्षण भिंती उभारून रेल्वे रूळ अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. मात्र तरीही रेल्वे रूळ ओलांडून अपघाताची परिस्थिती कायम आहे. रेल्वे प्रवाशी रेल्वे ब्रीज व सबवेचा वापर न करता लोकल पकडण्यासाठी शॉर्टकट वापरतात. त्यामुळे घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना लक्ष नसल्याने प्रवाशांचा रेल्वे अपघात मृत्यू होतो. रेल्वे प्रशासनाकडून अनेक वेळा प्रवाशांना प्रवासावेळी नियम पाळायचे आवाहन करत असते. परंतु, प्रवासी मात्र नियमांना पायदळी तुडवून प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांचा शॉर्टकट रस्ता त्यांच्याच जीवावर बेतत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -