घरमुंबईसावधान! बेस्टमध्ये प्रवास करताना 'हे' कृत्य केल्यास होई शकते कारवाई

सावधान! बेस्टमध्ये प्रवास करताना ‘हे’ कृत्य केल्यास होई शकते कारवाई

Subscribe

मुंबई | बेस्टने प्रवास करत असाल तर मोबाईल फोनवर (mobile phone) मोठ्या आवाजाचा व्हिडीओ एकणे आणि बघणाऱ्यांवर (clips/videos) कारवाई होऊ शकते. यासंदर्भात बेस्टने (Best bus) आदेश देखील जारी केले आहे.  यामुळे येथून पुढे बेस्टने प्रवाश करताना प्रवाशांना स्मार्टफोनचा वापरताना काळजी घ्यावी लागणार आहे. या बेस्टच्या आदेशानुसार बसगाड्यांमध्ये इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडियो किंवा व्हिडीओ ऐकताना आणि बघताना मोठा आवाज करण्यास मनाई केली आहे, असे बेस्टने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

 

- Advertisement -

सर्वजण मोबाईल फोनचा मुक्तपणे वापर करत आहेत. अनेकदा प्रवासी मोबाईलवर जोरजोरात बोलतात. तर काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकतात आणि बघत असतात. यावेळी प्रवाशांच्या मोबाईल फोनच्या आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसगाडीतील अन्य प्रवाशांना याचा त्रास होतो. यामुळे बेस्टने बस गाडीतून प्रवास करणाऱ्यांसाठी हे आदेश जारी केले आहेत.

 

- Advertisement -

या बेस्ट सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असल्यामुळे बसगाडीतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कलम ३८ आणि ११२ सदर प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. यामुळे बेस्टच्या बसागड्यांमध्ये इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ किंवा व्हिडीओ ऐकण्यास आणि बघताना मोठा आवाज केल्यास तुम्हाच्यावर कारवाई होऊ शकते, असे बेसच्या आदेशात म्हटले आहे.  यामुळे येथून पुढे बेस्टमधून तुम्ही प्रवास करत असाल तर नक्की काळजी घ्या.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -