घरमुंबईडॉ. अनहिताने सीटबेल्ट व्यवस्थित लावला नव्हता; सायरस मिस्त्री अपघात

डॉ. अनहिताने सीटबेल्ट व्यवस्थित लावला नव्हता; सायरस मिस्त्री अपघात

Subscribe

पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी डाॅ.पंडोल गाडी चालवत होत्या. सीटबेल्ट लावला नाही तर बेल वाजते. सीटबेल्ट नुसता खांद्यावर ठेवला तर बेल वाजत नाही. पंडोल यांनी तेच केले. सीटबेल्ट केवळ खांद्यावर ठेवला होता. तो डाव्या बाजुला लाॅक केला नव्हता. डाॅ.पंडोल यांचा हा बेजबाबदारपणा तपासात समोर आला आहे. आरोपपत्रात तो नमूद केला जाणार आहे.

 

मुबंईः टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री अपघात प्रकरणातील आरोपी डाॅ. अनहिता पंडोलने सीट बेल्ट व्यवस्थित लावला नसल्याची माहिती समोर आली आहे. पंडोल यांच्या या बेजबाबदारपणाची आरोपपत्रात नोंद केली जाणार आहे.

- Advertisement -

पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी डाॅ.पंडोल गाडी चालवत होत्या. सीटबेल्ट लावला नाही तर बेल वाजते. सीटबेल्ट नुसता खांद्यावर ठेवला तर बेल वाजत नाही. पंडोल यांनी तेच केले. सीटबेल्ट केवळ खांद्यावर ठेवला होता. तो डाव्या बाजुला लाॅक केला नव्हता. डाॅ.पंडोल यांचा हा बेजबाबदारपणा तपासात समोर आला आहे. आरोपपत्रात तो नमूद केला जाणार आहे.

४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोल गावच्या हद्दीतील सूर्या नदी पूलाच्या कठड्याजवळ मर्सिडीज बेँझ कारचा अपघात झाल होता. या अपघातात सायर पालनजी मिस्त्री आणि डिनशा पंडोल यांचा मृत्यू झाला होता. तर डाॅ. अनाहिता पंडोल व तिचे पती डरायस पंडोल किरकोळ जखमी झाले होते. डिनशा पंडोल हे डरायस यांचे बंधू होते.

- Advertisement -

डाॅ. पंडोल या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या १८ वर्षे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांनी जसलोक रुग्णालयात काम केले आहे. नायर रुग्णालयातून त्यांनी एमबीबीएस व एमडीचे शिक्षण घेतले आहे. अपघातानंतर त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गेल्या महिन्यात डाॅ.पंडोल यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला. भादविस कलम ३०४ (अ), २७९,३३७,३३८ सह मोटार वाहन कायदा कलम ११२/१८३, १८४, मोटार वाहन चालक नियम १४,०५,०६/१७७ (अ) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वसई प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मर्सडिज बेंझ इंडिया कंपनीकडून कारची तांत्रिक तपासणी करून अहवाल पोलिसांना देण्यात आला होता. तसेच चौकशीत कारचालक डाॅ.अनाहिता पंडोल यांनी कार हयगयीने आणि अविचाराने भरधाव वेगात चालवून धोकादायकरित्या ओव्हरटेक करताना सूर्या नदी पूलाच्या कठड्याला ठोकर मारल्याने अपघात झाल्याचे उजेडात आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -