घरमुंबईअनंत गीतेंना निवडून आणाणारच

अनंत गीतेंना निवडून आणाणारच

Subscribe

सेना - भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार

भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी निवडून यावेत तसेच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी रायगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना निवडून आणाणारच, असा निर्धार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यर्त्यांनी केला आहे.सेना-भाजपचा अलिबाग तालुक्यातील कार्यकर्त्यांची सुंयक्त सभा मंगळवारी अलिबाग येथील बिगफ्लॅश हॉटेलमध्ये झाली. या सभेत गीतेंना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भाजपाचे अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, भाजपा अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, दीपक रानवडे आदी यावेळी उपस्थित होते.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना 21 हजारांची आघाडी मिळाली होती. ती आघाडी यावेळी सुनील तटकरे यांना मिळणार नाही. अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघात अनंत गीते आघाडी घेतील, असा विश्वास भाजपाचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते व शिवसनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात पेयजल योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पूर्ण होत आले असून अलिबाग-वडखळ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मांडवा येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्यात आली आहे, ही कामे मागील पाच वर्षात झाली आहेत. ही कामे विरोधकांना दिसत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, अशी टीका अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -