घरमुंबईस्ट्रक्चरल ऑडिटचे गौडबंगाल

स्ट्रक्चरल ऑडिटचे गौडबंगाल

Subscribe

रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चर ऑडीटचा अहवाल गुलदस्त्यात असल्याने प्रवासी संघटनांकडून आश्चर्य व्यक्त केल जात आहे. ठाणे ते कर्जत कसारा परिसरातील रेल्वे पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट अवघ्या दोन तासात केल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) संघटक नंदकुमार देशमुख यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकातील पुलांची पाहणी करून स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले आहे. त्या स्ट्रक्चर ऑडीट नुसार अनेक पुलांची दुरूस्ती करण्यात आली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चर ऑडीटचा अहवाल गुलदस्त्यात असल्याने प्रवासी संघटनांकडून आश्चर्य व्यक्त केल जात आहे. ठाणे ते कर्जत कसारा परिसरातील रेल्वे पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट अवघ्या दोन तासात केल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) संघटक नंदकुमार देशमुख यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

पुलांच्या स्ट्रक्चर ऑडीटचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटयावर

अंधेरी पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर पुलांच्या स्ट्रक्चर ऑडीटचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ४४५ पुलांचा सुरक्षा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मग एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर केलेल्या पुलांच्या स्ट्रक्चर ऑडीटचे काय? त्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट केले नव्हते का? असे सवाल देशमुख यांनी उपस्थित केलेत. ठाणे ते कसारा आणि कर्जत या रेल्वे स्थानकावरील पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले होते. त्यावेळी रेल्वे अधिकार्‍यांच्या टीमबरोबर प्रवासी संघटनेचे पदाधिकारीही त्यांच्यासोबत होते.
रेल्वेने दोन ते तीन जणांची वेगवेगळी टीम तयार करून पुलाच्या स्ट्रक्चर ऑडीटचे काम केले होते. दोन तासातच हे काम पूर्ण झाले. मात्र स्ट्रक्चर ऑडीटचा अहवाल प्रवासी संघटनेलाही माहित नाही, असे देशमुख यांनी सांगितले. कल्याण कसारा प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी सांगितले की, स्ट्रक्चरल ऑडीटच्यावेळी आंबिवली पादचारी पूल कमकुवत झाल्याचे पाहणीत दिसून आले होते. त्यावेळी त्याची दुरूस्तीही करण्यात आली.

- Advertisement -

काही पुलांना मंजुरी मिळालीय पण कामांना सुरुवात झालेली नाही

आंबिवलीला एफओबी तयार झाला. तसेच कर्जत दिशेकडचा अंबरनाथ पूलाची व खडवली पुलाचीही दुरूस्ती करण्यात आली. मात्र स्ट्रक्चर ऑडीटचा अहवाल माहित नाही, असेही त्यांनी सांगितले. एका प्लॅटफॉर्मवर तीन पूल हवेत. पण कसारा खर्डी आटगाव या स्टेशनमध्ये एकच आहे. तसेच बदलापूर उल्हासनगर एफओबीचे जिने खूप अरूंद आहेत. गर्दीचा लोंढा आला तर चेंगराचेंगरी होऊ शकते. रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. पण त्यांनी पावले उचलली नाहीत. वासिंद पुलाचे फाऊंउेशन बांधून झाले आहे. पण चार ते पाच वर्षे हे काम बंद आहे. काही पुलांना मंजुरी मिळालीय पण कामांना सुरुवात झालेली नाही असेही राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -