घरमुंबईमोठा आवाज आला...समोर पाहिलं तर पूल कोसळला

मोठा आवाज आला…समोर पाहिलं तर पूल कोसळला

Subscribe

मंजू खारवा यांचे गोखले पुलानजीकच घर आहे. कामाला जाणाऱ्या लोकांनी पहाटेपासूनच लगबग असते. म्हणून त्या काम सकाळी ६ वाजताच आटपून घेतात. नेहमीप्रमाणे आजही त्यांचं सगळं काम साडेसातच्या सुमारात आटपलं . तेवढ्यात एक मोठा आवाज आला...

‘सकाळचे साडेसात वाजले असतील, नेहमीप्रमाणे घरकाम सुरु होतं अचानक मोठा आवाज आला. बघितलं तर समोर पूल पडतोय. ते पाहून हातातलं काम तसचं टाकलं. सगळ्यांना हे सांगायला आत वळले आणि पोलिसांना तातडीने फोन फिरवला’, मंजू खारवा यांच्या डोळ्यादेखत अंधेरीच्या गोखले पुलाचा भाग कोसळला.’ या घटनेनंतर मंजू खारवा इतक्या घाबरुन गेल्या की, या दुर्घटनेनंतर त्या काही काळ बाहेरच आल्या नाहीत. पण त्या या घटनेच्या प्रथम प्रत्यदर्शी आहेत.

‘वाचवा’ ची हाक

मंजू खारवा यांचे गोखले पुलानजीकच घर आहे. कामाला जाणाऱ्या लोकांनी पहाटेपासूनच लगबग असते. म्हणून त्या काम सकाळी ६ वाजताच आटपून घेतात. नेहमीप्रमाणे आजही त्यांचं सगळं काम साडेसातच्या सुमारात आटपलं . तेवढ्यात एक मोठा आवाज आला आणि पूलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर घाबरलेल्या मंजू इतरांना झालेली घटना सांगायला गेल्या. त्यावेळी त्यांच्या कानावार ‘वाचवा’ अशी हाक आली. घाबरलेल्या मंजूनी आजूबाजूच्या घरातील लोकांना ही बातमी देत आत कोणीतरी अडकले असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करुन सांगण्यात आले.

- Advertisement -

याविषयीच प्रथम प्रत्यक्षदर्शी मंजू खारवा यांच्याशी Exclusive बातचीत केली आमचे रिपोर्टर सुशांत सावंत यांनी

- Advertisement -

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पूल कोसळ्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पुलाचा राडारोडा उचलेपर्यंत वेळ जाणार असून ही वाहतूक पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे. सध्या या ठिकाणी ओव्हर हेड वायर तोडण्याचे काम सुरु आहे. तर तब्बल ७ तासानंतर अंधेरी ते सीएसटीएम ही हार्बर रेल्वे सुरु झाली आहे.

६० वर्षे जूना पूल 

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. हा पूल जीर्ण झाला होता. या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी देखील स्थानिकांनी केली होती. पण या मागणीकडे रेल्वेप्रशासनाने कानाडोळा केला असा आरोप स्थानिकांकडून होत आहे. मंगळवारी या पुलाचा भाग कोसळल्यानंतर पुन्हा एकदा जीर्ण पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -