घरमुंबईMumbai Suburban : सोमवारी अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणी नाही

Mumbai Suburban : सोमवारी अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणी नाही

Subscribe

मुंबई: के/पूर्व विभाग येथील महाकाली गुंफ़ा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’ जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व)’ येथे नवीन १५०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ५ जून रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत के/पूर्व आणि के/पश्चिम विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

हेही वाचाःज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन; उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

- Advertisement -

संबंधित परिसरातील नागरिकांनी सदर कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

खालील विभागात पाणीपुरवठा बंद/ कमी दाबाने पाणीपुरवठा

१) त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व) – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

- Advertisement -

२) सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व) – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

३) विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विले-पार्ले पूर्व तसेच विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एयरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, अंधेरी पूर्व पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

४) मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व) – पाणीपुरवठा कमी दाबाने होईल

# के / पश्चिम -:

१) मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व) – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

एप्रिल महिन्यात ३० दिवस होती पाणी कपात

मुंबईच्या पाणीपुरवठयात ३० दिवस १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र ही पाणी कपात केवळ १५ टक्के नसून ती प्रत्यक्षात ५० टक्केपर्यंत आहे.त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, तुळशी, विहार अप्पर वैतरणा या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रत्यक्षात मुंबईची लोकसंख्या १.५० कोटी पेक्षा जास्त असून मुंबईला खरे तर दररोज किमान पाच हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आवश्यकतेपेक्षाही खूपच कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यातही, पाणीपुरवठा करणाऱ्या काही जलवाहिन्या या ब्रिटिश काळातील जुन्या जलवाहिन्या असल्याने कधी कधी त्या जलवाहिन्या फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाया जाते. या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी मुंबई महापालिकेने एक महिना १५ टक्के पाणी कपात जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात पाणी कपात १५ टक्के नसून ५० टक्केपर्यंत सुरू आहे, असा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -