घरमुंबईकामगार रुग्णालय आग प्रकरण; ४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कामगार रुग्णालय आग प्रकरण; ४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Subscribe

आग प्रकरणी पोलिसांनी एसीचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या चारही जणांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मुंबईतील मरोळ येथील कामगार रुग्णालय आग प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आग प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या आग प्रकरणी पोलिसांनी एसीचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या चारही जणांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता या रुग्णालयामध्ये अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून १४७ जण जखमी झाले होते. काही जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले तर काही जखमींवर सध्या कूपर, होली स्पिरीट या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – कामगार रुग्णालयात आग; मृतांचा आकडा ९ वर

- Advertisement -

४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नेमकी आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये एसीचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या चौघांची चौकशी सुरू आहे.


हेही वाचा – Hospital Fire : पायपुसण्यामध्ये गुंडाळला चिमुरडीचा मृतदेह

- Advertisement -

अशी घडली घटना

अंधेरी मधील मरोळ येथे कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अंधेरीच्या कामगार रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत एकूण १४७ लोक जखमी झाले आहेत. तर या घटनेमध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने अनेकांना रुग्णालयातून बाहेर काढले. आगीच्या घटनेमुळे घाबरलेल्या काही लोकांनी उड्या मारल्या त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्यांवर कूपर, होली स्पिरीट, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा आणि सेव्हन हिल रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान देखील जखमी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -