घरमुंबई साठवण जलाशयामुळे मिलन सब वे होणार पूरमुक्त

 साठवण जलाशयामुळे मिलन सब वे होणार पूरमुक्त

Subscribe

पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीच्या काळात अंधेरी परिसरातील 'मिलन सबवे' लगतच्या परिसरात पाण्याचा निचरा अत्यंत संथ गतीने होतो.‌ यावर पर्यायी उपाययोजना म्हणून मिलन सबवे लगत असणाऱ्या महापालिकेच्या एका भूखंडावर तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे 'साठवण जलाशय' उभारण्यात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात साठवण जलाशयामुळे हिंदमाता ( Hindmata) परिसर ज्याप्रमाणे पूरमुक्त होणार आहे, त्याचप्रमाणे अंधेरी परिसरातील मिलन सब वे (Milan subway) परिसरसुद्धा २ कोटी पाणी साठवण क्षमता असलेल्या जलाशयाच्या उभारणीमुळे पूरमुक्त (flood free) होणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी, मंगळवारी पश्चिम उपनगरातील मिलन सब वे, पोयसर नदी विकास प्रकल्प, रस्ते, पूल बांधकामे आदींची पाहणी केली. तसेच, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई,रस्ते, पूल दुरुस्ती आदी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी, पालिकेच्या ‘परिमंडळ ७’ च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर यांच्यासह पालिकेच्या संबंधित विभागांचे व खात्यांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

साठवण जलाशयामुळे दिलासा
पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीच्या काळात अंधेरी परिसरातील ‘मिलन सबवे’ लगतच्या परिसरात पाण्याचा निचरा अत्यंत संथ गतीने होतो.‌ यावर पर्यायी उपाययोजना म्हणून मिलन सबवे लगत असणाऱ्या महापालिकेच्या एका भूखंडावर तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे ‘साठवण जलाशय’ उभारण्यात येत आहे. या साठवण जलाशयाचे काम प्रगतीपथावर असून येत्या पावसाळ्यात याचा उपयोग होण्यास सुरुवात होणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे. अंधेरी (पूर्व ) परिसरात असणाऱ्या तेली गल्ली पासून ते गोखले उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्यावरून नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा पूल ५७० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचा असणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्त यांनी यावेळी घेतला.

स्वतंत्र मार्गिकांची व्यवस्था

- Advertisement -

तसेच पर्यावरणपूरक विकासाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या गोरेगावातील दिनकरराव देसाई मार्गासह (आरे कॉलनी मार्ग) परिसरातील विविध रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. विशेष म्हणजे या परिसरात असणाऱ्या वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे, यासाठी वनखात्याच्या सल्ल्यानुसार रस्त्याच्या खालून वन्य प्राण्यांसाठी स्वतंत्र मार्गिकांची व्यवस्था देखील या प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. तसेच एकही झाड न कापता करण्यात येत असलेल्या या प्रकल्प कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज पाहणी केली.

नवा रस्ता उपलब्ध

‘आर दक्षिण’ विभागांतर्गत पोईसर नदीवर डहाणूकर वाडी ते ‘लिंकिंग रोड’ दरम्यान नवीन पुलाची उभारणी प्रगतीपथावर आहे. ८० मीटर लांब व १७ मीटर रुंद असणाऱ्या या पुलामुळे परिसरातील नागरिकांना आणखी एक नवा रस्ता उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी या पुलाच्या कामाची आज पाहणी केली व संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, ‘आर (मध्य)’ विभागाअंतर्गत बोरिवली पश्चिमेला ‘कल्पना चावला चौक’ ते ‘स्वामी विवेकानंद मार्ग’ यादरम्यान ‘आर. एम. भट्टड’ मार्गावरून जाणाऱ्या उड्डाण पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

वाहतुकीवरचा ताण कमी होणार

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांनी या पुलाच्या कामाची आज पाहणी करीत सदर कामाचा आढावा घेतला.
तब्बल ९३७ मीटर लांब आणि १५.३ मीटर रुंद असणाऱ्या या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या पुलामुळे आर. एम. भट्टड मार्गावरील व परिसरातील वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -