शिवसेनेतून घाण निघून गेली, आता जे काय व्हायचे ते चांगले होणार – आदित्य ठाकरे

aditya thackeray
आदित्य ठाकरे

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी घान निघून गेली, आता जे काय व्हायचे ते चांगले होणार. आपल्या लोकांमुळे आपल्याला दगा झालेला आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आमदारांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह घेत आज रात्रीच वर्षा बंगला सोडतो असे म्हटले. रात्री मला आपण आजच बंगला सोडत असल्याचे सांगितले आणि आम्ही निघालो. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. म्हणूनच रात्री रस्त्यावर नागरिकांनी, नगरसेवकांनी, शिवसैनिकांनी गर्दी केली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेतील घान निघून गेली –

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील घान निघून गेली, जे काय व्हायचे ते चांगलेच होणार आहे. आपल्या लोकांमुळे आपल्याला दगा झालेला आहे. बहुमत सिद्ध करायला त्यांना सर्वांना मुंबईत यावे लागेल. एअरपोर्ट वरून विधान भवनला जाणारे रस्ते आमच्या वर्ळी मतदार संघातून जातात. जे गेले ते आपले कधीच नव्हतेच. ते लोक केंद्र सरकारला घाबरून तीकडे गेले आहेत. हीम्मत आहे लढायची तर प्रत्येकांने राजीनामा पाठवा आणि समोर लढायला उभे रहा. असा इशार उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाला दिला आहे. त्यांच्या पुढे भाजपमध्ये जाणे किंवा प्रहारमध्ये जाणे एवढाच पर्याय आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काही आमदारांना पळवून आणि किडनॅप करुन नेले –

संपर्कात असलेल्या १७ ते १८ आमदारांना पळवून आणि कि़डनॅप करुन नेले आहे, असे त्यांच्या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांना कैद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केली आहे. गुवाहाटीत एका बाजूला या आमदारांचा रोजचा जेवणाचा खर्च नऊ लाख रुपये आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पूरस्थितीत लोकांना जेवायचे अन्न नसल्याची टीका त्यांनी केली.

एनक फ्लोअरटेस्ट बाहेर होईल – 

जेव्हा हे आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत उतरलीत, बांद्राहून येतील आणि वरळी, भायखळ्यातून त्यांना जावे लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही आदित्य यांनी दिला आहे. एक फ्लोअर टेस्ट आत होईल तर दुसरी बाहेर होईल असे संकेत त्यांनी दिलेत.