घरमुंबई'मुंबई विमानतळावर नमाजसाठी जागा असेल तर हिंदूंसाठी...' महंत अनिकेत शास्त्रींचं मुख्यमंत्री एकनाथ...

‘मुंबई विमानतळावर नमाजसाठी जागा असेल तर हिंदूंसाठी…’ महंत अनिकेत शास्त्रींचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Subscribe

महंत अनिकेत शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या ओझर विमानतळाला 'जटायू' असं नाव देण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आणखी एक नवीन मागणी केली आहे.

मुंबई विमानतळावर मुस्लिम धर्मीयांना नमाज करता यावी यासाठी प्रेअर रूम बनवण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी मुंबई विमानतळावर पुन्हा एक नवी मागणी केली आहे. “मुंबई विमानतळावर नमाज करण्यासाठी प्रेअर रूम बनवली आहे, तर हिंदू धर्मीयांसाठी तिथे मंदिरही बांधा,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीय.

महंत अनिकेत शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या ओझर विमानतळाला ‘जटायू’ असं नाव देण्याची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मुलन कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आणखी एक नवीन मागणी केली आहे. मुंबई विमानतळावर नमाजसाठी जागा असेल तर हिंदू धर्मीयांना प्रार्थना करण्यासाठी मंदिरही बांधा, सरकारने तसे न केल्यास मुंबई विमानतळावरील नमाजासाठीची प्रेअर रूमही बंद करावी, असं देखील त्यांनी या पत्रातून म्हटलंय.

- Advertisement -

 

सर्वच समाज त्या ठिकाणी जाऊन पूजा विधी करेल

महंत अनिकेत शास्त्री म्हणाले की, संविधानानुसार सर्वांना समान अधिकार असायला हवेत. विमानतळावर मुस्लिम बांधवांसाठी नमाज पठणासाठी प्रेअर रूम असताना इतर धर्मीयांसाठीही अशी व्यवस्था करावी. सर्वच समाज त्या ठिकाणी जाऊन पूजा विधी करेल. फक्त एका समाजाला मुभा देणे चुकीचे आहे, असं देखील त्यांनी या पत्रातून म्हटलंय.

- Advertisement -

महंत अनिकेत शास्त्री यांच्या या मागणीवर सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. काही दिवसांपूर्वी महंत अनिकेत शास्त्री नुकतेच बागेश्वर धामला पाठिंबा दिल्यानंतर प्रकाशझोतात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केवळ हिंदू धर्मियांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी हिंदू धर्मियांना पूजेसाठी जागा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -