Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

Related Story

- Advertisement -

अनिल कुमार लाहोटी यांनी ३० जुलैपासून मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. महाव्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी ते उत्तर रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी होते. ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE) चे १९८४ च्या बॅचचे अधिकारी असून आयआयटी रुडकी (पूर्वीचे रुडकी विद्यापीठ) मधील मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (स्ट्रक्चर्स) आहेत.

अनिल कुमार लाहोटी यांना रेल्वेमध्ये विविध अनुभव आहेत. मध्य रेल्वेमध्ये सुरुवातीला रूजू झाल्यावर त्यांनी नागपूर, जबलपूर (आता पश्चिम मध्य रेल्वेवरील), भुसावळ विभाग आणि मध्य रेल्वे मुख्यालय येथे १९८८ ते २००१ पर्यंत विविध पदांवर काम केले. त्यांनी सदस्य इंजिनियरिंग, रेल्वे बोर्ड यांचे विशेष कार्य अधिकारी (Officer on Special Duty) म्हणून काम केले आहे, तसेच मुख्य अभियंता (निर्माण), उत्तर रेल्वे; कार्यकारी संचालक (ट्रॅक मशीन्स), रेल्वे बोर्ड आणि उत्तर मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे.

- Advertisement -

अनिल कुमार लाहोटी यांनी जमीन आणि हवाई जागेचा वाणिज्यिक विकास आणि सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलचा विकास यासह जागतिक दर्जाचे स्टेशन म्हणून नवी दिल्ली स्टेशनच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी दिल्लीमधील आनंद विहार येथे दिल्लीतील एक नवीन दिशात्मक टर्मिनल आणि नवी दिल्ली स्थानकात प्रतिष्ठित द्वितीय प्रवेशाच्या विकासासाठी नियोजन आणि बांधकाम केले आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण), मुख्य अभियंता (निर्माण) पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक नवीन पायाभूत सुविधा, दुहेरीकरण, यार्ड रिमॉडेलिंग आणि महत्त्वाचे पूल यांचे पायाभूत प्रकल्प राबविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

अनिल कुमार लाहोटी रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक सिव्हिल इंजिनिअरिंग (नियोजन) म्हणून सुरक्षा, देखभाल, पुनर्वसन आणि पर्मनंट वे (रेल्वे मार्गावरील) सुधारणा, उच्च एक्सल लोडचे संचालन धोरण आणि ट्रॅकवरी उच्च गती या धोरणात्मक निर्णय घेण्या-या टीमचा भाग होते. ट्रॅक मेंटेनन्स निकष समितीचे सदस्य म्हणून, ट्रॅक देखभाल व्यवस्था कार्यक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ट्रॅक मापनांवर आधारित ट्रॅक देखरेखीसाठी वस्तुनिष्ठ देखभाल निकषावर एक वस्तुनिष्ठ धोरण विकसित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी ट्रॅक देखभालीच्या यांत्रिकीकरण आणि ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि भारतीय रेल्वेवर ट्रॅक देखभालीच्या संपूर्ण यांत्रिकीकरणासाठी सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्यात लाहोटी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लखनौ या नात्याने त्यांनी लखनौ विभागात प्रवासी आणि मालवाहतूक तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना केला. अनिल कुमार लाहोटी यांनी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद; बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली येथे एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्राम; कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे अ‍ॅडव्हान्स लीडरशिप आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोग्राम आणि अमेरिका येथेच कॉन्टॅक्टलेस ट्रॅक रेकॉर्डिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी अधिकृत सरकारी कामांसाठी यूएसए, जर्मनी, यूके, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, हाँगकाँग, जपान, चीन अशा विविध देशांत प्रवास केला आहे.

- Advertisement -