घरताज्या घडामोडीअनिल परब ईडीच्या चौकशीला गैरहजर, १४ दिवस मुदतीची वकिलांची मागणी

अनिल परब ईडीच्या चौकशीला गैरहजर, १४ दिवस मुदतीची वकिलांची मागणी

Subscribe

११ वाजण्याच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत.

राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब हे चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर राहिले नाहीत. मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही. मला चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता १४ दिवसांची मुदत देण्यात यावी, असे अनिल परब यांनी पत्राद्वारे ईडीला कळवले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांची लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता समन्स बजावले होते. त्यानुसार ११ वाजण्याच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागून घेतला असून ईडीने त्याला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून मंगळवारी आपण चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले आहे. मंत्री असल्यामुळे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला १४ दिवसांचा अवधी देण्यात यावा, असे परब यांनी पत्रात म्हटले आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे. आता परब यांना वेळ द्यायचा की त्यांना दुसरे समन्स काढायचे यावर ईडीचे अधिकारी विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी परब यांना आलेल्या समन्सवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परब यांना ईडीने नोटीस दिली असली तरी परब आज ईडी समोर हजर होणार नाहीत, असे राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा : आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव घ्यायला?, मुख्यमंत्र्यांचा जन आशीर्वाद यात्रेवरुन हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -