घरताज्या घडामोडीअनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा

अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा

Subscribe

महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरिट सोमय्या यांच्याविरोधात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी १०० कोटींचा मानहानिचा दावा ठोकला आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यावर परब यांनी सोमय्या यांना ७२ तासात माफी मागा नाहीतर १०० कोटींचा मानहानिचा दावा ठोकण्याचे खुले आव्हान दिले होते. पण ७२ तास उलटूनही सोमय्या यांनी परब यांची माफी मागितली नाही. यामुळे परब यांनी सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

किरीट सोमय्यांना परब यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अनिल परब यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. दापोलीत अनिल परब यांचे बेकायदेशीर रिसॉर्ट असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. परब यांनी  याचिकेमध्ये १०० कोटींसोबतच सोमय्यांनी माफी मागावी तसेच हा माफीनामा दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावा अशी मागणी केली आहे.त्यांचबरोबर सोमय्या यांनी ट्वीटर हँडलवर न्यायालय सांगेल तेवढा काळ  माफीनामा ठेवावा, अशी मागणी  केली आहे

- Advertisement -

गेले काही दिवस सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. एका मंत्र्याचे नाव जाहीर केल्यानंतर ते पुढचा नंबर कोणाचा असेल याची भविष्यवाणी करत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळीची झोप उडाली आहे. सोमय्या यांनी नुकताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत खळबळ उडवून टाकली आहे. त्याआधी सोमय्या यांनी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत राजकीय वर्तृळात भूकंप केला होता.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -