Eco friendly bappa Competition
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी केली- अनिल परब

सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी केली- अनिल परब

Subscribe

अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलाय. तसंच सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील अनिल परब म्हणाले.

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने व्यावसायिक सदानंद कदम यांना ताब्यात घेतले आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते जवळचे सहकारी मानले जातात. अनिल परब यांनी दापोली साई रिसॉर्टचा व्यवहार हा कॅशमध्ये सदानंद कदम यांच्यासोबत केला असल्याची प्रार्थमिक माहिती ईडीकडे आहे. यानंतर आता अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलाय. तसंच सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील अनिल परब म्हणाले.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांना ईडीने चौकशीसाठी मुंबईला बोलावलं आहे. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब? असं सूचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून सोमय्या यांच्या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. सदानंद कदम हे अनिल परब यांचे पार्टनर असल्याचं या ट्वीटमध्ये सोमय्यांनी म्हटलं.

- Advertisement -

त्यानंतर अनिल परब यांनी विधानपरिषदेत किरीट सोमय्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय. यावर स्पष्टीकरण देताना अनिल परब म्हणाले की, मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या ज्या जुन्या वसाहती आहेत, त्यात मोकळी जागा असते. एकूण ५६ वसाहती मुंबईत आहेत. या वसाहतीत अशी कोणतीही जागा नाही की जिकडे २२० स्केअर फुटमध्ये राहणाऱ्या माणसाने आपल्या घराचा वरंडा वाढवला नाही. त्या सोसायटीने तिथे एक शेड बांधला होता. २००४ मध्ये जेव्हा मी लोकप्रतिनिधी झालो. मी तिथे राहत असल्यामुळे तिथल्या लोकांनी मला तिथे बसून काम करण्यास परवानगी दिली, सोसायटीने परवानगी दिल्यानंतर त्या शेडमध्ये बसून मी आमदार म्हणून काम करत होतो.”

- Advertisement -

यापुढे बोलताना परब म्हणाले की, “५६ वसाहतीत अशा प्रकारे वरंड्याची जागा वाढवली आहे. तरीही माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडा भूखंड हडपला असा खोटा आरोप केला. म्हाडाने केलेल्या खुलाशानंतर हे बांधकाम माझं नाही, हे स्पष्ट झालं. म्हाडाने मला दिलेली नोटीस मागे घेतली. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीची वारंवार बदनामी करणं आणि खोटे आरोप करणं यावर आळा बसला पाहिजे.” तसंच ज्या अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस न देता मला नोटीस पाठवली. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी अनिल परब यांनी केली.

- Advertisment -