घरमुंबईअनिल तटकरे पिता-पुत्रांच्या सेना प्रवेशात खोडा

अनिल तटकरे पिता-पुत्रांच्या सेना प्रवेशात खोडा

Subscribe

श्रीवर्धनच्या शिवसैनिकांचा जोरदार विरोध !

मुंबई:- सुनील तटकरे यांना आव्हान देऊन रोहा आणि श्रीवर्धनमध्ये स्वत:चे बस्तान निर्माण करू पाहणारे तटकरेंचे पुतणे अवधूत आणि त्यांचे पिताश्री अनिल तटकरे यांना रायगड जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनीही चार हात दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना डावलून या पितापुत्रांना सेनेत प्रवेश नको, अशी मागणी रायगड जिल्हा शिवसेनेने केली आहे.
तटकरे कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आल्यानंतर हा वाद आता मिटण्याच्या पलिकडे गेला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही भावांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

ज्या सुनील तटकरेंचा हात धरून पुतण्या रोह्याच्या नगराध्यक्षपदी बसला त्याच अवधूतने रोह्यातच सुनील तटकरेंना आव्हान देण्यास सुरुवात केली. पर्याय म्हणून अवधूतला श्रीवर्धनची आमदारकी दिल्यावर आता अवधूत आणि त्याचे वडील अनिल तटकरे यांनी सुनील तटकरेंच्या मार्गात काटे पसरले. आपली महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही अशी ओरड करत हे पितापुत्र आता सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मात्र पिळावळ पक्षात नको, अशी मागणी करत रायगड जिल्ह्यातल्या सैनिकांनी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
श्रीवर्धनच्या आमदारकीपासून अनिल आणि अवधूत तटकरे यांची शिवसेनेशी सलगी सुरू झाली होती. उध्दव ठाकरेंच्या रोहा दौर्‍यात धावीर महाराजांच्या दर्शनावेळी अवधूत उध्दव ठाकरेंबरोबर होते. अवधूत आणि अनिल तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील असे सांगितले जात असले तरी या दोघांच्या स्वार्थी राजकारणाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात सेनेला बसल्याच्या वाढत्या तक्रारी ‘मातोश्री’ करण्यात आल्या आहेत.

श्रीवर्धन हा सेनेचा बालेकिल्ला. आजवर या तालुक्यातून अ.र.अंतुले यांचा अपवाद वगळता सेनेचेच आमदार निवडून आले. ही परंपरा अवधूत तटकरे यांनी मोडून काढली. श्रीवर्धनमधून निवडून येऊनही अवधूत यांनी या तालुक्याकडे जराही लक्ष दिले नाही, अशा तक्रारी सैनिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केल्या होत्या. जनतेशी मतदारांशी संपर्कच ठेवला नाही. तटकरे कुटुंबाने आपली म्हणजे पक्षाची फसवणूक केल्याची भावना इथल्या शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे नेत्यांनी स्वीकारलं तरी शिवसैनिक त्यांना स्वीकारतील की नाही याबददल साशंकताच अधिक आहे. तटकरे बापलेकांच्या मातोश्रीवारीची बातमी येवून धडकल्यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -