घरमुंबईसिंह, वाघ ३ लाख, चित्ता २० हजार तर नीलगाय ३० हजार! संजय...

सिंह, वाघ ३ लाख, चित्ता २० हजार तर नीलगाय ३० हजार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वन्य प्राणी दत्तक योजना

Subscribe

कुत्रा, मांजरासारख्या पाळीव प्राण्याप्रमाणेच तुम्ही अभयारण्यातील आवडता वन्य प्राणी दत्तक घेऊ शकणार आहात. कारण मुंबईतील बोरिवली परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक घेण्याची योजना राबवण्यात आली आहे. यासाठी उद्यान प्रशासनाने वन्य प्राण्याला दत्तक घेण्यासाठी दर निश्चित केले आहे. यात वाघ, सिंह, हरण, निलगाय यांसारखे बरेच प्राणी तुम्हाला दत्त घेता येणार आहेत.

या राष्ट्रीय उद्यानात सिंह, वाघ, चित्ता, बिबटा, वाघाटी, निलगाय, हरिण अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल केली जाते. मात्र या प्राण्यांच्या देखभालीसाठी मोठा आर्थिक खर्च आवश्यक असतो. उद्यानातील एका वाघासाठी वर्षभरात लाखोंचा खर्च येतो. त्यामुळे प्राण्यांच्या देखभालीचा खर्च उचलण्यासाठी ही योजना दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवली जात आहे. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वनं आणि वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. यासाठी वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना एका वर्षांकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे.

- Advertisement -
sanjay gandhi national park scheme for wildlife adoption
सिंह, वाघ ३ लाख, चिता २० हजार तर नीलगाय ३० हजार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वन्य प्राणी दत्तक योजना

असे आहेत दर

वाघ ३ लाख १० हजार, सिंह रुपये ३ लाख, बिबटे एक लाख २० हजार, वाघाटी ५० हजार, नीलगाय ३० हजार,  चित्ता २० हजार, भेकर १० हजार रुपये किंमतीला दत्तक घेता येईल. या वन्य प्राणी दत्तक योजनेत तुम्हालाही सहभागी व्हायचे असल्यास वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व), मुंबई. ईमेल — [email protected] भ्रमणध्वनी — ७०२०२८२७१४ संपर्क साधावा.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -