घरताज्या घडामोडीराणी बागेत पाहायला मिळणार गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट!

राणी बागेत पाहायला मिळणार गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट!

Subscribe

३१ जानेवारीपासून ’वार्षिक उद्यान प्रदर्शना’ला सुरुवात होणार आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’, ’म्हातारीचा बूट’, भारतातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, चित्रनगरीचे प्रतीक असणारा कॅमेरा, असे मुंबईची ओळख असणारे विविध मानबिंदू एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. निमित्त आहे ते ’वार्षिक उद्यान प्रदर्शना’चे. अर्थात पाना-फुलांपासून तयार केलेल्या ’गेट वे ऑफ इंडिया’, म्हातारीचे बुट इत्यादी प्रतिकृती या प्रदर्शनास साकारल्या जाणार असून मुंबईकरांचे ते आकर्षण केंद्र ठरणार आहे.

महापौरांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन

महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणाऱ्या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारी २०२० रोजी सकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्तांसह विविध मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच २ फेब्रुवारी २०२० रोजी होणार्‍या समारोपीय कार्यक्रमालाही महापौर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

- Advertisement -

दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात

दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे ’वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आता मुंबईची एक ओळख ठरू लागले आहे. मुंबईची ओळख असणाऱ्या ’मानबिंदू’च्या प्रतिकृती अशी या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या अंतर्गत पाना-फुलांपासून तयार केलेल्या विविध मानबिंदूच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ’सेल्फी पॉइंट’ यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या कृष्ण वडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात ’याची देही, याची डोळा’ बघता येणार आहेत.

या प्रदर्शनात कोणत्या वस्तू मिळणार?

या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनासोबतच आयोजित होणार्‍या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आरटीओ कार्यलयावर मनसेचा ‘चाबूक मोर्चा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -