घरCORONA UPDATEमहापालिकेच्या आणखी एका शिपाई महिलेचा कोरोनामुळे मृत्यू!

महापालिकेच्या आणखी एका शिपाई महिलेचा कोरोनामुळे मृत्यू!

Subscribe

कोरोना उपाययोजनांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील सहा ते सात कामगार,कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असताना बिगर अत्यावश्यक सेवेतील इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभागातील एका शिपाई महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेने ५० टक्के व त्यानंतर १०० व आता ७५ टक्के उपस्थितीचा फतवा जारी केल्याने सध्या बिगर अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचारी कामावर येत आहे. त्याचाच हा बळी असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील करनिर्धारण व संकलन विभागातील विभाग निरिक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुकादम, शताब्दी रुग्णालयातील कर्मचारी, वीजतंत्री आणि महापालिका मुख्यालयातील विकास नियोजन व इमारत प्रस्ताव विभागातील महिला शिपाई यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. ही महिला कर्मचारी गोवंडी येथे राहणाऱ्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेच्या सहा ते सात कामगार,कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

महापालिकेत आणखी ३ सुरक्षा रक्षक कोरोनाबाधित

महापालिका मुख्यालयात आता एका मागून एक असे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तीन दिवसांपूर्वी महापालिकेचा सुरक्षा रक्षकाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पाचव्या मजल्यावरील शिपाई महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी मुख्यालयातील सुरक्षा विभागाच्या आणखी तीन सुरक्षा रक्षकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत  मुख्यायलात ९ ते १० कोरोना रुग्ण आढळून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हे ही वाचा – मालेगावातली परिस्थिती हाताबाहेर नाही, २५० रुग्णांना डिस्चार्ज – राजेश टोपे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -