Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई बेस्टच्या ताफ्यात आणखी चार इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसगाड्या दाखल

बेस्टच्या ताफ्यात आणखी चार इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसगाड्या दाखल

Subscribe

मुंबई: बेस्ट उपक्रमात मुंबईकर व विदेशी पर्यटकांच्या पसंतीला उतरलेल्या आणखीन चार इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस गाड्या दाखल झाल्या आहेत. मंगळवारपासून बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व गेट वे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान या एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस प्रवाशांसाठी रस्त्यावर धावतील.
यापूर्वी दाखल दोन एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस गाड्या सध्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमात एसी बस गाड्यांची संख्या सहा झाली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण २०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. आतापर्यंत ६ इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसगाड्या दाखल झाल्या आहेत. तर उर्वरित १९४ एसी डबलडेकर बसेस ऑक्टोबरपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.
सध्या उन्हाळी सुट्टी असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक मुंबईत येत असल्याने रात्रीच्या हेरिटेज टुरला प्रवासी पसंती देत असून रोजचा महसूल २५ लाखांच्या घरात पोहोचल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या डबलडेकर बसेस मुंबईची शान आहेत. मात्र डबलडेकर बसेसना १५ वर्षें पूर्ण होत असल्याने त्या जुन्या झाल्याने मोडीत काढण्यात येत आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३६ डबलडेकर जुन्या बसेस आहेत. परंतु मुंबईची शान कायम रहावी यासाठी डबलडेकर बसेसचा ताफा वाढवण्यात येत आहे. यासाठी बेस्ट २०० डबलडेकर एसी इलेक्ट्रीक बसगाड्या खरेदि करणार आहे. सध्या त्यापैकी दोन बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिली ईलेक्ट्रीक डबल डेकर बस मुंबईत दाखल झाली. मुंबईकरांना या एसी बसमधून अवघ्या सहा रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर, पर्यावरणपूरक व गारेगार प्रवास घडत आहे. या डबल डेकर बस मुंबकरांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -