Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईत ड्रग्जचा काळा बाजार सुरुच, तिघांना अटक अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई!

मुंबईत ड्रग्जचा काळा बाजार सुरुच, तिघांना अटक अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई!

Subscribe

गेले काही दिवस मुंबई, ड्रग्ज आणि बॉलिवूड अशी एक वेगळी चर्चा सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपुत प्रकरणात एनसीबीने केलेल्या तपासात अनेक नावं समोर आली आहेत. यात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. यावरून मुंबईत ड्रग्ज मोठठ् जाळं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत गांजा आणि एमडीचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला जातो. यात मोठमोठ्या व्यक्तींचा हात असतो. हे एकंदर सुशांत प्रकरणातील एनसीबीच्या तपासावरून लक्षात आले. त्यातच आता वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे.

सुमारे चौदा लाख रुपयांच्या एमडी आणि गांजासह दोघांना वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हेरॉन अशोक राय आणि चंदाली बशीर अहमद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी २१ किलो गांजा आणि २५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत १४ लाख २० हजार रुपये आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विलेपार्ले येथे काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजजळील रसराज बसस्टॉपसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी तिथे हेरॉन राय हा आला होता, यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना २५० ग्रॅम वजनाचे एमडी सापडले. या एमडी ड्रग्जची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे. ही कारवाई ताजी असतानाच या पथकाच्या अधिकार्‍यांनी पवई येथील सुखविंदर रोड, जय अभियंता कार्यालयाजवळील शंकर मंदिर बसस्टॉपसमोरुन चंदाली अन्सारीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी २१ किलो गांजाचा साठा जप्त केला. या गांजाची किंमत ४ लाख २० हजार रुपये आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

ठाण्यातूनही अटक

- Advertisement -

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात गांजाची विक्री करणा:या नरुलहक अक्तर सय्यद (२६) ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या वागळे इस्टेट पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ५३ हजारांचा १२ किलो ६९०  ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. वागळे इस्टेट ज्ञानसाधना महाविज्ञालयाकडे जाणा:या मार्गावरील सेवा रस्त्यावर एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्या पथकाने सापळा रचून नुरुलहक सय्यद याला ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये एका सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या गोणीमधून चार वेगवेगळया गठठयातून एक लाख ७०  हजार रूपयांचा आठ किलो ५४०  ग्रॅम वजनाचा गांजा तसेच तिथून पसार झालेल्या त्याच्या साथीदाराच्या ताब्यातून ८३  हजारांचा चार किलो १५० ग्रॅम असा दोन लाख ५३  हजारांचा गांजा हस्तगत केला आहे. गांजा विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी सय्यद याच्याविरुद्द वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – ‘मालिकेच्या सेटवर हालगर्जीपणा कराल तर…’, अमेय खोपकरांनी दिला इशारा!


- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -