घरताज्या घडामोडीAntilia bomb scare case: आरोपी सुनील माने, संतोष शेलार आणि आनंद जाधव...

Antilia bomb scare case: आरोपी सुनील माने, संतोष शेलार आणि आनंद जाधव या तिघांना २५ जूनपर्यंत NIA कोठडी

Subscribe

न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने याचा एनआयएला (NIA) ताबा मिळाला असून प्रदीप शर्मा आणि इतर ४ आरोपींना समोर ठेवून सुनील मानेकडे चौकशी करण्यात येणार आहे. ११ जून रोजी अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांची एनआयए कोठडी संपली होती, दोघांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयातून ताबा घेण्यात आलेल्या सुनील माने आणि संतोष शेलार, आनंद जाधव या तिघांना २५ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

माजी एन्काऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतर आरोपीची समोर समोर चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रदीप शर्मा यांनी रोज वकिलाला भेटायची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. त्यानुसार त्यांना १२ ते १२.२० या काळात वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. रोज २० मिनिटे भेटता येणार आहे.

- Advertisement -

संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनी शर्मा आणि वाझे यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेनची हत्या केली. मनसुखचा एकाने डावा हात पकडला होता तर एकाने उजवा हात पकडून ठेवला होता. आम्हाला दोघांची अजून १० दिवसांची कोठडी हवी आहे. या प्रकरणातले आणखी काही आरोपी फरार आहेत त्याची माहिती या आरोपीकडून मिळू शकते म्हणून आम्हाला कोठडी हवी आहे अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली.


हेही वाचा – Mansukh Hiren Murder Case: मोठी बातमी! अखेर मनसुख हिरेनच्या हत्येचा उलगडा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -