घरताज्या घडामोडीAntilia bomb scare case: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना NIAकडून अटक; २८ जूनपर्यंत...

Antilia bomb scare case: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना NIAकडून अटक; २८ जूनपर्यंत NIA कोठडी

Subscribe

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके सापडल्याप्रकरणी (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (mansukh hiren death case) शिवसेनेचे नेते आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज सकाळी सहा वाजता एनआयएने (NIA) छापा टाकला. या छापेमारीत एनआयएच्या हाती याप्रकरणाच्या संबंधी काही महत्वाचे तांत्रिक पुरावे हाती लागले आहे. या पुराव्यावरून अखेर प्रदीप शर्मा यांना अटक (pradeep sharma arrested) करण्यात आली आहे. आता प्रदीप शर्मा यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. शर्मा यांच्यावर यापूर्वीच संशय होता, त्यांची याप्रकरणात चौकशी देखील करण्यात आली होती. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणातील ही ८वी अटक असून ठाण्यातील आणखी एक अधिकारी एनआयएच्या रडारवर आहे. या अधिकाऱ्याला देखील लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

आज सकाळी एनआयएने प्रदीप शर्मांच्या अंधेरीत घराची झाडाझडती घेतली. तर दुसऱ्या बाजूला लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये एनआयएच्या एका टीमने प्रदीप शर्मांना ताब्यात असून टीम मुंबईकडे रवाना झाली. आज त्यांना अटक करण्याची शक्यता होती. त्यानुसार त्यांना अटक केली आहे. जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून त्यांना थोड्याच वेळात सेशन कोर्टात हजर करणार आहे.

संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना ११जून रोजी अटक केल्यानंतर शर्मा यांचा थेट संबंध असल्याचे या दोघांच्या चौकशीत समोर आले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार हा शर्मा यांचा निकटवर्तीय मानला जातो आणि शर्मा यांचा व्यवसाय देखील संतोष शेलार बघत होता अशी माहिती समोर येत आहे. तसेच आनंद जाधव हा लखनभैया फेक एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अटकेत असलेल्या आनंद जाधव याने न्यायालयात थेट प्रदीप शर्मा याचे नाव घेतल्यामुळे एनआयए च्या तपासाला वेग आला आणि प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

मनसुख हिरेन याची हत्या का करण्यात आली हे जरी उघडकीस आले असले तरी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार तसेच त्यात मिळून आलेले धमकीच्या पत्राचे गूढ आद्यप समोर आलेले नाही. स्फोटकांनी भरलेल्या कार ठेवण्यामागे नेमके काय कारण असू शकते याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे, त्यात अनेक तर्कवितर्क काढण्यात आले होते मात्र खरे कारण समोर आलेले नव्हते. परंतु प्रदीप शर्माच्या अटकेनंतर या गूढ उकलण्याची शक्यता असून लवकरच अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या कार ठेवण्यामागच्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -