घरताज्या घडामोडीपोलिसांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अमान्य, मनसुख यांची हत्याच - हिरेन कुटुंबीय

पोलिसांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अमान्य, मनसुख यांची हत्याच – हिरेन कुटुंबीय

Subscribe

मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर हिरेन कुटुंबियांची प्रतिक्रिया

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणाला मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एक वेगळंच वळणं लागलं आहे. हिरेन यांचे कुटुंबिय सातत्याने त्यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत आहेत. आता हिरेन यांच्या पोस्टमार्टम प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यात मनसुख यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आणि कुठल्याही घातपाताचा उल्लेख नाही आहेत. तसंच शरीरावर कोणत्याही जखमा नसून मृतदेह सापडण्या आधीच १२ ते २४ तासांपूर्वी मनसुख यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण मनसुख हिरेन यांचं कुटुंबिय पोलिसांच्या या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर समाधानी नाही आहेत. जोपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर येत नाही, तोपर्यंत कुटुंब थांबणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे यांनी कुटुंबियांच्या वतीने दिली.

मनसुख हिरेन यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट

- Advertisement -

मनसुख हिरेन यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हिरेन कुटुंबियांसोबत ठाणे व्यापार संघटनातील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर ठाणे व्यापार संघटनेतील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यातील सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे म्हणाले की, ‘आताच हिरेन कुटुंबियांसोबत व्यापारी संघटनेची आणि समाजाची चर्चा झाली. कुटुंबियाचं मत घेऊन आम्ही आलो आहोत. मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट काहीही येवो, पण त्यांची हत्याच झालेली आहे, असं हिरेन कुटुंबियाचं मत आहे. कारण आमचा माणूस गेलेला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. तसंच त्याप्रमाणे एफआयआर दाखल झाला पाहिजे. शिवाय जे कोणी दोषी असतील त्याचा देखील तपास झालाच पाहिजे. आम्ही अजूनही समाधानी नाही आहोत. फॉरेन्सिक रिपोर्ट दोन ते तीन महिन्यांनी येणार तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही, असं हिरेन कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे.’

पोलीस उपायुक्त हिरेन कुटुंबियांना भेटल्यानंतर काय झालं?

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी हिरेन कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी पोलिसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती कुटुंबियांना केली. तसंच आम्ही याप्रकरणातला तपास व्यवस्थितपणे करू, असं आश्वासन पोलिसांनी हिरेन कुटुंबियांना दिलं. पण जोपर्यंत आम्हाला न्याय देताय असं वाटत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं कुटुंबियांच यावेळी मत होत.

- Advertisement -

हेही वाचा – सचिन वाझेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, तब्बल तीन तास झाली चर्चा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -