घरताज्या घडामोडीPradeep Sharma Arrested: 'ही' घटना ठरली प्रदीप शर्मांच्या अटकेच कारण

Pradeep Sharma Arrested: ‘ही’ घटना ठरली प्रदीप शर्मांच्या अटकेच कारण

Subscribe

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आज ८वी अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आज याप्रकरणी एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता प्रदीप शर्मांच्या अंधेरी येथील घरावर एनआयएने छापा टाकला होता. यादरम्यान याप्रकरणाशी काही संबंधित पुरावे एनआयएच्या हाती लागले आणि या पुराव्याच्या आधारे प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मां यांच्या अटकेचे कारण एक घटना होती, ती कोणती जाणून घ्या.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएने ११ जूनला दोन जणांना अटक केली होती. संतोष शेलार आणि आनंद जाधव असे या अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे होती. आरोपी आनंद जाधव याला लातूर येथून अटक करण्यात आली होती. यामध्ये अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार हा शर्मा यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. माहितीनुसार, संतोष शेलार हा शर्मा यांचा व्यवसाय बघत होता. तर दुसरा आरोपी आनंद जाधव हा लखनभैया फेक एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अटक केल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपी आनंद जाधवने न्यायालयात थेट प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले. त्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग आला आणि प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांचा हिरेन हत्या प्रकरणात देखील समावेश आहे. विनायक शिंदे याच्यासोबत या दोघांनी मनसुख हिरेन याची हत्या करून मृतदेह मुंब्रा खाडीत टाकल्याचा संशय एनआयएला संशय असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच अनुषंगाने एनआयए तपास करीत होती. एनआयएच्या विशेष न्यायालयाने या दोघा आरोपींना २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी याप्रकरणी एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव यांचा समावेश आहे. आज प्रदीप शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीश या तिघांना अटक केली आहे. यामुळे आता याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १०वर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -