घरताज्या घडामोडीAntilia bomb scare case: अँटिलिया प्रकरणात NIAने दोन जणांना केली अटक

Antilia bomb scare case: अँटिलिया प्रकरणात NIAने दोन जणांना केली अटक

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने (NIA) दोन जणांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. आरोपी आनंद जाधव याला लातूर येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

आरोपी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांचा हिरेन हत्या प्रकरणात देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. विनायक शिंदे याच्यासोबत या दोघांनी मनसुख हिरेन याची हत्या करून मृतदेह मुंब्रा खाडीत टाकल्याचा संशय एनआयएला आहे. या अनुषंगाने एनआयए तपास करीत आहे. मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एकत्र करण्यात आला असून या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी सचिन वाजे, रियाजुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार,आनंद जाधव या सर्वांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेले संतोष शेलार आणि आनंद जाधव हे दोघे मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथे राहणारे असून या दोघांना पोलीस निरीक्षक सुनील माने याच्या सांगण्यावरून या गुन्ह्यासाठी मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तयार करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – केक, पेस्ट्रीद्वारे ड्रग्ज पुरवणाऱ्या बेकरीवर छापा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -