Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याचा सुनील मानेचा अर्ज मागे

अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याचा सुनील मानेचा अर्ज मागे

Subscribe

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार जप्त केल्याप्रकरणी आणि त्यानंतर उद्योगपती मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी माजी पोलीस कर्मचारी सुनील माने (Sunil Mane) यांनी मंगळवारी विशेष न्यायालयातून माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज मागे घेतला आहे.

सुनील माने यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यात न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात आपली चूक लक्षात आल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी त्याच्या पोलीस कारकिर्दीतील ‘उत्कृष्ट रेकॉर्ड’चा विचार करावा आणि त्यांना 2021 मध्ये क्षमायाचना देऊन ‘त्याच्या चुकीचा पश्चात्ताप करण्याची’ संधी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, मंगळवारी (9 मे)  माने यांनी विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) न्यायालयाला सांगितले की, माने यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी दिलेला अर्ज त्यांना मागे घ्यायचा आहे. अशा स्थितीत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. यानंतर माने यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे कायद्याची पदवी असल्याने त्यांना आपली बाजू मांडायची आहे आणि न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात नवी मुंबईतील तळोजा कारागृहाने मुख्य आरोपी असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात गैरवर्तनाची तक्रार न्यायालयाकडे केली होती. त्यांनी दावा केला की, 23 एप्रिल रोजी वाजे तुरुंगातच बेशुद्ध पडले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. तुरुंग प्रशासनाने त्यांना तुरुंगाच्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उच्च सुरक्षा सेलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्याचा त्यांनी आग्रह धरला होता. मात्र सचिन वाझे यांनी पोलिसांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, मी कधीही रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला नाही. माझ्या जीवाला धोका आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे मला तुरुंगाच्या रुग्णालयात का हलवले जात आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण
25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही  गाडी सापडली होती. या एसयूव्हीचे मालक व्यापारी मनसुख हिरण होते, मात्र त्यांनी गाडी चोरीला गेल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर 5 मार्च 2021 रोजी ठाण्यामध्ये एका नाल्यात मनसुख हिरेन मृतावस्थेत आढळून आले होते. या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे प्रमुख आरोपी असून, या प्रकरणात आणखी काही पोलिसांवर आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -