घरताज्या घडामोडीतापसी-अनुराग आयकरच्या हिटलिस्टवर , छापासत्र तीन दिवस चालणार

तापसी-अनुराग आयकरच्या हिटलिस्टवर , छापासत्र तीन दिवस चालणार

Subscribe

तापसी व अनुरागच्या  कार्यालयांवरील हे छापासत्र अजून तीन दिवस सुरु राहील असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज आयकरच्या हिटलिस्टवर आहेत. बुधवारी पुण्यात अनुराग कश्यपच्या फँन्टम कार्यालयावरही आयकर विभागाने छापा घातला. रात्री उशीरापर्यंत ही छापेमारी सुरू होती. तसेच तापसी व अनुरागचीही यादरम्यान चौकशी सुरू होती. तापसी व अनुरागच्या  कार्यालयांवरील हे छापासत्र अजून तीन दिवस सुरु राहील असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

या दोघांच्या कार्यालयातून काही डिजिटल दस्तावेज एकत्र करण्यात येत आहेत. पुण्यानंतर या दोघांच्या मुंबईतील कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. यावेळी लॅपटॉप व अनेक इलेक्ट्रीकल वस्तूंचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, तापसी व अनुराग सातत्याने केंद्र सरकारवर टीका करतात. यातूनच केवळ सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसने केला आहे. यामुळे या छापेमारीवरून राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -