घरताज्या घडामोडी'जगायचा अधिकार फक्त अर्णबला आहे का?' अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी सांगितली आपबीती!

‘जगायचा अधिकार फक्त अर्णबला आहे का?’ अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी सांगितली आपबीती!

Subscribe

५ मे २०१८ रोजी सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या सुसाई़ड नोटमध्ये रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सारडा अशा तीन व्यक्तींची नावं लिहिली होती. या प्रकरणी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अलिबागमधून अर्णब गोस्वामी यांना अटक केली. यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊ सविस्तर भूमिका स्पष्ट केली. यावेळी ‘फक्त अर्णब गोस्वामीलाच जगायचा अधिकार आहे का? अर्णब गोस्वामीचं स्टेटमेंट जॉइंट सीपींच्या पीसीवर रेकॉर्ड केलं जातं. पण आमची फरफट का केली जाते?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे…

सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सारडा या तिघांची नावं होती. अर्णब गोस्वामींचा प्रोजेक्ट अन्वय यांचा शेवटचा होता. त्यात अन्वय नाईक यांनी स्वत:चे पैसे टाकून काम केलं होतं. पण अर्णब गोस्वामी यांनी त्याचे पैसे दिले नाहीत. अर्णब सातत्याने अन्वय नाईक यांना धमकी देत होता. तुझे पैसे मिळू देणार नाहीत. तुझ्या मुलीचं करिअर बरबाद करून ठेवीन, अशी धमकी अर्णब आणि फिरोजकडून येत होती.

- Advertisement -

२०१७ मे मध्ये रिपब्लिक चॅनलच्या स्टुडिओचं काम आम्ही पूर्ण करून दिलं होतं. पण सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांनी हे सगळं केलं. ६.४ कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं. गरज होती म्हणून किंमत खूप कमी करून कॉन्ट्रॅक्ट केलं आम्ही. पण ६.४ कोटींपैकी ८३ लाख दिलेच नाहीत. त्याशिवाय फिरोजकडून ४ कोटी आणि नितीन सारडाकडून ५५ लाख येणं बाकी होतं. पण तेही नाही मिळाले. आमच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील पैसे उरले नाहीत.

आम्हाला फोन यायचे. घरी लोकं येऊन बसायचे. मुरबाडला जाताना मला बायकर्स फॉलो करायचे. धमकवायचे. घरी येऊन आम्हाला मारहाण देखील केली गेली. आम्ही जगायचंच नाही का? फक्त अर्णब गोस्वामीलाच जगायचा अधिकार आहे का? अर्णब गोस्वामीचं स्टेटमेंट जॉइंट सीपींच्या पीसीवर रेकॉर्ड केलं जातं. पण आमची फरफट केली जाते.

- Advertisement -

तेव्हा आम्ही संजय बर्वे, अनिल पारसकर, सुरेश वऱ्हाडे या वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो. पण शेवटपर्यंत असंच सांगितलं जात होतं की तुम्हाला चौकशीसाठी बोलवती. पण कधी बोलवलंच नाही. या अधिकाऱ्यांनी अर्णब गोस्वामींना फेव्हर केला. शेवटी मे महिन्यात जेव्हा अक्षता नाईक (पत्नी) यांनी व्हिडिओ रिलीज केला, त्यानंतर पुन्हा धमक्या यायला सुरुवात झाली. तेव्हा आम्हाला सांगितलं की केस क्लोज झाली आहे. मग आम्ही सगळी कागदपत्र गोळा केली.

anvay naik suicide note

अक्षता नाईक यांनी ५ मे २०२० रोजी केलेला व्हिडिओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -