मुंबई : राज्यातील डी. एड आणि बी. एड प्रवेशासाठी एकेकाळी लांबच्या लांब रांगा लागत होत्या. मराठी शाळांची घटती संख्या आणि राज्य सरकारच्या धोरणातील उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांनी डी. एड आणि बी. एड महाविद्यालयाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे यंदा 31 हजार 207 पैकी आता 4 हजार 147 प्रवेश झाल्यांची माहिती मिळाली आहे. तर सध्या 20 हजार जाग रिक्त आहे. त्याचबरोबर राज्यातील 21 डी.एड अध्यापक महाविद्यालय बंद पडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
राज्यात 12 वर्षापासून शिक्षक भरती रखडल्याने बेरोजगारीत वाढ झाली. त्याचबरोबर शिक्षक होण्यासाठी टीईटी टेट परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच 2017 पासून शिक्षक भरतीच न झाल्याने खासगी आणि शासकीय शाळांमध्ये 60 हजारांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या ठिकाणी शिक्षक भरती ही मंद गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेक्षाकडे प्रचंड अनास्थेने पाहिजे जाते.
हेही वाचा – बालमृत्यूत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आघाडीवर; 16 जिल्ह्यांत साडेचार वर्षांत 6 हजार मृत्यूंची नोंद
मराठी शाळांची घटती संख्या
राज्यातील शहरी भाग आणि ग्रामीण भागातील मराठी शाळेतील मुलांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात घट असून ही पटसंख्या टिकवण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारबरोबर शिक्षकांकडे देखील आहे. तसेच खासगी शाळांमध्ये लाखांचे डोनेशन देऊनही शिक्षकांना संघर्ष करावा लागतो. डी. एडनंतर टीईडी, टेट उत्तीर्ण होऊन ही विद्यार्थी खासगी शाळांतून रुज झाले आहेत. या शिक्षकांना वेळ पगार देखील मिळत नाही. यामुळे शिक्षकांना इतर कामे करावी लागतात.