Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ambani security scare : एपीआय रियाझ काझीला NIA मार्फत अटक

Ambani security scare : एपीआय रियाझ काझीला NIA मार्फत अटक

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणी आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला आज रविवारी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) मार्फत अटक करण्यात आली. एपीआय रियाज काझी असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. सचिन वाझे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून रियाज काझी या पोलिस अधिकाऱ्याला ओळखले जाते. स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यासाठी रियाज काझीला रविवारी अटक करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून रियाज काझीची पोलिसांमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान रियाज काझी याने सरकारी माफीचा साक्षीदार बनण्याचीही तयारी दर्शवली होती. पण आज एपीआय काझीला एनआयएकडून अटक करण्यात आली. लवकरच त्यालाही एनआयए कोर्टासमोर हजर केले जाऊ शकते. तसेच या संपुर्ण प्रकरणात एनआयएमार्फत रियाज काझीहीची पोलिस कोठडी मागितली जाऊ शकते. एनआयए कोर्टाने नुकतीच सचिन वाझेला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच काही तासातच रियाझ काझीला अटक करण्यात आली आहे. या संपुर्ण स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटके प्रकरणातच ही अटक एनआयएकडून झाली आहे. रियाज काझीला झालेली ही आतापर्यंतची ही दुसरी अटक आहे. रियाज काझी हे मुंबईच्या सीआययू युनिटमध्ये पीएसआय म्हणून कार्यरत होते. अंबानीच्या घरासमोर स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणामध्ये सचिन वाझे यांना पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्या प्रकरणीच ही अटक झाल्याने समजते. सचिन वाझे यांच्यासोबत अतिशय जवळून काम करणाऱ्यापैकी स्फोटके प्रकरणामध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यानेच पीएसआय रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. याआधीही अनेकदा एनआयएकडून रियाज काझी यांना संपुर्ण प्रकरणात चौकशीला बोलावण्यात आले होते. त्यामध्ये पुरावे नष्ट करण्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीवीआर गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न रियाज काझीकडून झाला होता. पण आतापर्यंत या संपुर्ण प्रकरणात रियाज काझी माफीचा साक्षीदार होईल अशी चर्चा होती. पण आता एनआयएकडून रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणामध्ये रियाज काझीला एनआयए कोर्टातही हजर करण्यात येईल असे कळते. कोर्टारसमोर रियाज काझीला माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळते, की त्याच्यावर कारवाई होणार हे येत्या दिवसातच स्पष्ट होईल. दरम्यान रियाज काझींकडून आणखी काही जणांची नावेही समोर येतील असेही बोलले जात आहे.

- Advertisement -

याआधीच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याआधीच माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनएनआयएकडून चौकशीला बोलावण्यात आले होते. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनाही एनआयएने चौकशीसाठी बोलावले होते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे कारण देत प्रदीप शर्मा यांची एनआयएमार्फत दोन दिवस चौकशी झाली होती. तर परमबीर सिंह यांचीही चौकशी एनआयएकडून करण्यात आली होती.


 

- Advertisement -