घरमुंबई‘पेशंट सेफ्टी' परिषदेतून रुग्णांच्या सुरक्षिततेवर लक्ष

‘पेशंट सेफ्टी’ परिषदेतून रुग्णांच्या सुरक्षिततेवर लक्ष

Subscribe

अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी ‘पेशंट सेफ्टी' परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

रुग्णांची सुरक्षा या विषयावर गांभिर्याने लक्ष देणं गरजेचं असून यावर चर्चा होणं ही आता महत्त्वाचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, हैदाबादमधील अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपमध्ये येत्या १३ आणि १४ सप्टेंबर २०१९ ला ८ व्या इंटरनॅशनल ‘पेशंट सेफ्टी कॉन्फरन्स’चे आयोजन केलं जाणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या सुरक्षेबद्दल जगभरातील गुणवत्ता तज्ज्ञांकडून माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे, रुग्ण सुरक्षेचा दर्जा सुधारण्यासाठी आणखी मदत होऊ शकेल. आयपीएससी ही रुग्णांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रीत करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी परिषद आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्यांबाबत, सुधारणा घडवून आणण्यासाठीची प्रक्रिया आणि सुव्यवस्थित कार्यप्रणालीची भूमिका याबाबत चर्चा केली जाईल. कल्पना, नाविन्य आणि प्रेरणा ही या परिषदेची यंदाची संकल्पना आहे.

परिषदेत ‘या’ विषयांवर होणार चर्चा

परिषदेत होणार असलेल्या चर्चेत तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्श यांची तुलना, आरोग्यसेवा क्षेत्रातील मनुष्यबळाचे भवितव्य, रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर बाबी जसं संसर्ग नियंत्रण, औषधांचे व्यवस्थापन, रेडिएशन सुरक्षा ते सुविधा सुरक्षा आणि मान्यता इत्यादी विषयांचा समावेश असेल.

आरोग्य सेवेत रुग्णांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. जेव्हा आपल्या देशात आयुष्मान भारत योजनेमार्फत आरोग्य सेवांचा प्रसार केला जात आहे तेव्हा या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्यसेवेसोबत या क्षेत्रातील मनुष्यबळाच्या कमतरतेच्या समस्येवर उपाय काढणं गरजेचं आहे. या परिषदेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात रुग्णांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अंमलात आणले जाऊ शकतील अशी धोरणं समोर येतील.
– संगीता रेड्डी, अपोलो हॉस्पिटल्सच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर
- Advertisement -

३०० पैकी एका व्यक्तीला इजा होण्याची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, विमान प्रवासा दरम्यान लाखोंमधील एका व्यक्तीला इजा पोहोचण्याची शक्यता असते तर, आरोग्य उपचारांदरम्यान ३०० पैकी एका व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असते. जगभरातील क्षय आणि मलेरिया यासारख्या आजारांमुळे रुग्णांच्या होणाऱ्या नुकसानाशी तुलना करता उपचारांदरम्यान रुग्णांना पोहोचणारी इजा, त्यांचे होणारे नुकसान हे मृत्यू दराचे १४ वे प्रमुख कारण आहे. एका अनुमानानुसार जगभरात दरवर्षी ४२१ मिलियन लोक हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातात आणि त्यापैकी हॉस्पिटलमध्ये जवळपास १० पैकी एका रुग्णाच्या बाबतीत नुकसानकारक घटना सुरक्षाविषयक कारणांमुळे होतात. दोन तृतीयांशपेक्षा जास्त घटना या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.


हेही वाचा – गडकिल्ल्यांसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेऊ नये – जयकुमार रावल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -